agrowon news in marathi, automatic weather station inauguration in bori budruk, Maharashtra | Agrowon

स्वयंचलित हवामान केंद्राचे बोरी बुद्रुक येथे उद्‌घाटन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

आळेफाटा, जि. पुणे : अॅग्रोवन स्मार्ट प्रकल्पात समाविष्ट असलेल्या बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत, नुकतेच स्वयंचलित हवामान केंद्राचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना वातावरणाची माहिती मिळण्यासाठी तयार केलेल्या वेबसाइटचे देखील अनावरण करण्यात आले. लवकरच अॅड्रॉइड अॅपदेखील शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.

आळेफाटा, जि. पुणे : अॅग्रोवन स्मार्ट प्रकल्पात समाविष्ट असलेल्या बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत, नुकतेच स्वयंचलित हवामान केंद्राचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना वातावरणाची माहिती मिळण्यासाठी तयार केलेल्या वेबसाइटचे देखील अनावरण करण्यात आले. लवकरच अॅड्रॉइड अॅपदेखील शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.

शेतकऱ्यांना http://boriweather.aashaymeasurements.com/default.aspx या संकेत स्थळावर बोरी बुद्रुकची सर्व हवामानविषयक माहिती उपलब्ध होईल.

या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे हवामानविषयक सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे, जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पंचायत समिती सदस्या अनघा घोडके, बोरी बुद्रुकच्या सरपंच पुष्पा कोरडे, मुख्यमंत्री ग्रामविकास प्रतिनिधी पूनम सातपुते, गोरक्षनाथ उकिरडे, संदीप जाधव, जय मस्करे, अशोक घोडके, ‘अग्रोवन स्मार्ट व्हिलेज’चे अधिकारी डॅनी वोल्टझोक, मुख्य अधिकारी अरविंद गुप्ता, जयप्रकाश कुलकर्णी, आशय मेजरमेंट प्रा. लि. कंपनीचे संचालक शंतनू पेंढारकर, राकेश नलावडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

दरम्यान, बोरी बुद्रुकचा सकाळ - अॅग्रोवन स्मार्ट व्हीलेज प्रकल्पात समावेश आहे. गावाच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे हवामानविषयक सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना झाली असल्याचे पूनम सातपुते यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...