agrowon news in marathi, availability of fresh water decreased in India, Maharashtra | Agrowon

भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटली
वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

आम्ही पहिल्यांदा एकापेक्षा जास्त उपग्रहाद्वारे निरीक्षणे नोंदविली आहेत. यामध्ये जगातील अनेक भागात पाण्याचा अतिरेकी वापर झाल्याचे आढळून आले. भारतात गोड्या पाण्याचे स्राेत घटत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
- मॅट रॉडेल्ल, शास्त्रज्ञ, गोड्डार्ड स्पेस प्लाइट सेंटर, ‘नासा’

वॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी स्राेतांचा अतिवापर केला जातो. त्यामुळे येथे गोड्या पाण्याच्या उपलब्धतेत गंभीर घट झाली आहे, असा निष्कर्ष ‘नासा’ पृथ्वीच्या उपग्रहाद्वारे केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे.

‘नासा’च्या गोड्डार्ड स्पेस प्लाइट सेंटर येथील शास्त्रज्ञ हे जगातील कोणत्या भागात मानवी व्यवहारामुळे गोड्या पाण्याचे स्राेत बदलत आहे आणि त्याची कारणे काय याचा अभ्यास करतात. या अभ्यासाच्या निष्कर्षाचा अहवाल नंतर प्रसिद्ध केला जातो. शास्त्रज्ञांनी जगातील ३४ भागातील १४ वर्षातील बदलाचे निरीक्षण केले आणि जागतिक गोड्या पाण्याची काय प्रवृत्ती आहे याचा अभ्यास केला. ‘नासा’ने नुकताच याविषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

‘‘मानवाची पाणी व्यपस्थापन पद्धती, हवामान बदल, निर्गाचे बदलते चक्र इत्यादी वेगवेगळ्या घटकांमुळे पृथ्वीवरील ओली जमीन ही आणखी ओली होत आहे आणि कोरडी जमीन ही आणखी कोरडी होत आहे,’’ असे नासाने या अहवालात म्हटले 
आहे. 

उत्तर भारतात पाणीपातळी घटली
उत्तर भारतात भात आणि गहू ही जास्त पाणी लागणारी पिके घेतली जातात. या पिकांना सिंचनासाठी येथे पाण्याचा अतिवापर होत आहे. परिणामी या भागातील भूजलाचा अतिरेकी उपसा होत आहे. त्यामुळे या भागातील पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. तसेच ‘नासा’ने अभ्यास केलेल्या काळात या भागात सरासरी पाऊस झाला आहे. परंतु या भागातील भूजलाचा आधीच अतिरेकी उपसा झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाऊस झाला तरी विहीर आणि भूजलाचे पुनर्भरण होणे शक्य नाही. त्यामुळे यापुढील काळात या भागात दुष्काळ पडल्यास पाणी उपलब्ध राहणार नाही, असे अहवालात नमूद केले आहे.

या भागातील स्त्रोत घटले
भारतातील उत्तर आणि पूर्व भाग, मध्य आशिया, कॅलिफाेर्निया आणि आॅस्ट्रेलिया या देशांमध्ये गोड्या पाण्याच्या अतिवापरामुळे उपलब्ध पाण्याचे स्राेत घटत आहेत. याचे परिणाम हे देश किंवा हा भाग पाणी टंचाईच्या स्वरूपात भोगत आहे. पृथ्वीवर पिण्यासाठी आणि शेतीसाठी गोडे पाणी हा मुख्य स्राेत आहे. जगात अनेक भागात पाणी वापर हा स्थिर आहे तर अनेक भागात यात वाढ किंवा घट होत आहे. 

स्थिती चिंताजनक
शास्त्रज्ञ जय फेमिग्लायटी म्हणाले, की हा अभ्यास करताना आम्हाला जलशास्त्रीय बदल आढळले आहेत. ही स्थिती चिंताजनक आहे. आम्हाला एक विशिष्ट पॅटर्न पाहायाला मिळाला. ज्या भागात उच्च अक्षांश आणि उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे. तेथील ओली जमीन ही अती ओली होत आहे, आणि कोरडी जमीन ही जास्त कोरडी होत आहे. भूजलाच्या अतिरिक्त उपशाने पाणीपातळी खोल गेल्याने त्याचा परिणाम जमीन कोरडी होण्यावर झाला आहे. 

अहवालातील निष्कर्ष

  • जगातील अनेक भागात गोड्या पाण्याचे स्त्रोत घटले
  • मानवाची पाणी व्यपस्थापन पद्धती, हवामान बदल, निर्गाचे बदलते चक्र याचा परिणाम
  • भारत, मध्य आशिया, कॅलिफाेर्निया आणि आॅस्ट्रेलियातील पाण्याची उपलब्धता घली.
  • पृथ्वीवरील ओली जमीन ही आणखी ओली होत आहे आणि कोरडी जमीन ही आणखी कोरडी होत आहे
  • उत्तर भारतात गहू आणि भात या पिकांमुळे पाण्याचा अतिरेकी वापर
  • जलस्त्रोत घटल्याने ग्लोबल वाॅर्मिंगचा धोका वाढला. 

इतर अॅग्रो विशेष
गोंधळलेला शेतकरी अन् विस्कळित नियोजनशेती क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व हे नियोजनाला आहे...
निराशेचे ढग होताहेत अधिक गडद७  ते १० जूनपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस   ...
राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागूमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
‘एसएमएस’ अटीमुळे हजारो शेतकरी...लातूर : शासनाने राज्यातील चार लाखापेक्षा जास्त...
शेतातील जीवसृष्टी सांभाळल्यास मातीतून...नाशिक : शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री...नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२...
कांदाप्रश्‍नी ‘करेक्शन’ करण्याच्या...नाशिक : लोकसभेच्या आगामी निवडणुकांकडे लक्ष...
राज्यातील १४५ बाजार ‘ई-नाम’शी जोडणारमुंबई (प्रतिनिधी) : शेतमालाला रास्त भाव मिळवून...
काय आणि कसं पेरावं ?लाखनवाडा, जि. बुलडाणा ः लाखनवाडा येथे एेन खरीप...
जलसंधारण, बहुवीध पीक पद्धतीतून धामणी...अनेक वर्षांपासून दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या...
भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप...भारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान...
का झाले बीटीचे वाटोळे?राज्यात सुमारे १५० लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो...
अनधिकृत कापूस बियाणे आणि हतबल सरकारमहाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने ...
नवे संशोधन, नवे वाण ही काळाची गरज...आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारास झालेला विलंब...
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेरजळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव...
एच. टी. तंत्रज्ञानाला मान्यता देऊन...पुणे ः राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या कापूस...
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज...
नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध... नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक...