agrowon news in marathi, Bank officers misbehave with female farmers for loan crop, Maharashtra | Agrowon

पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली शरीरसुखाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या  सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यावर पोलिसांनी गुरुवारी (ता. २१) रात्री गुन्हा दाखल केला असून, हा आरोपी फरार झाला आहे.  या प्रकरणी बुलडाण्यासह राजभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या  सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यावर पोलिसांनी गुरुवारी (ता. २१) रात्री गुन्हा दाखल केला असून, हा आरोपी फरार झाला आहे.  या प्रकरणी बुलडाण्यासह राजभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील दाताळा या मलकापूर तालुक्यातील गावातील  शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पीककर्जासाठी गुरुवारी येथील सेंट्रल बँकेत गेला. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली. संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला, त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लिल संभाषण करून  शरीरसुखाची मागणी केली. तसेच, मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळा पॅकेज देईन, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला.

संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली.  त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक बी. आर. गावंडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपासचक्रे फिरविली. चौकशीअंति गुरुवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी गिरीश बोबडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोरी फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...