खाद्यतेलांच्या आयात मूल्यात कपात

खाद्यतेलांच्या आयात मूल्यात कपात
खाद्यतेलांच्या आयात मूल्यात कपात

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने सर्व खाद्यतेलांच्या आयात मूल्यात घट केली आहे. सर्वाधिक घट ही कच्च्या सोयाबीन तेलाच्या आयात मूल्यात करण्यात आली आहे. कच्च्या सोयाबीन तेलाच्या आयात मूल्यात प्रतिटन २४ डॉलरने घट करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून मिळाली आहे.  केंद्र सरकारने २७ एप्रिलला आयात मूल्यात बदल केला होता. जागतिक खाद्यतेलाच्या किमती आणि विदेशी चलनाच्या मूल्यातील बदलानुसार सरकार आयात मूल्यात बदल करत असते. याआधी सरकारने २७ एप्रिलला आयात मूल्यात बदल केला होता. त्यानंतर आता आयात मूल्यात कपात करण्यात आली आहे.

सर्वाधिक कपात ही कच्च्या सोयाबीन तेलाच्या मूल्यात केली आहे. सोयाबीनच्या कच्च्या तेलाचे मूल्य प्रतिटन २४ डॉलरने घटवून ८२४ डॉलरवरून ८०० डॉलर करण्यात आले आहे. तसेच, शुद्ध आणि दुर्गंधीमुक्त पोमोलीन तेलाचे आयात मूल्य ६९४ डॉलर प्रतिटनावरून ६८१ डॉलर प्रतिटन करण्यात आले आहे. कच्चे पामतेलाच्या मूल्यात ६७१ डॉलरवरून ६५५ डॉलरपर्यंत कपात करण्यात आली आहे.  भारत हा जगातील सर्वांत मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. आयात होणाऱ्या खाद्यतेलात पाल्म तेलाचा वाटा सर्वांत जास्त आहे. पाल्म तेलाची आयात ही मुख्य करून इंडोनेशिया आणि मलेशिया देशांतून होते. सोयाबीन तेलाची आयात ही सर्वांत जास्त अर्जेंटिना देशातून होते. अर्जेंटिना हा सोयाबीन उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.  प्रतिटन बदल असा

  •  कच्च्या पाम तेलात १६ डॉलरने कपात
  •  शुद्ध आणि दुर्गंधीमुक्त पाम तेलात १४ डॉलरने कपात
  •  कच्च्या पामोलीन तेलात १३ डॉलरने कपात
  •  शुद्ध आणि दुर्गंधीमुक्त पामोलीन तेलात १३ डॉलरने कपात
  •  कच्च्या सोयाबीन तेलात २४ डॉलरने कपात
  • अशी झाली कपात (प्रतिटन/डॉलर)

    खाद्यतेल   १५ मे   २७ एप्रिल  बदल
    कच्चे पाम तेल    ६५५  ६७१   (-)१६
    शुद्ध आणि दुर्गंधीमुक्त पाम तेल  ६७२   ६८६   (-)१४
    कच्चे पामोलीन तेल  ६७८   ६९१   (-)१३ 
    शुद्ध आणि दुर्गंधीमुक्त पामोलीन तेल    ६८१    ६९४    (-)१३
    कच्चे सोयाबीन तेल    ८००     ८२४   (-)२४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com