agrowon news in marathi, bcchu kadu says, give two thousand rupees bonus to tur producer, Maharashtra | Agrowon

तूर उत्पादकांना दोन हजार बोनस न दिल्यास आंदोलन : बच्चू कडू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

अमरावती ः तुरीची शासकीय हमीभाव खरेदी सुरू करावी किंवा तूर उत्पादकांना प्रतीक्‍विंटल दोन हजार रूपये बोनस देण्यात यावा, अन्यथा प्रहारच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. 

अमरावती ः तुरीची शासकीय हमीभाव खरेदी सुरू करावी किंवा तूर उत्पादकांना प्रतीक्‍विंटल दोन हजार रूपये बोनस देण्यात यावा, अन्यथा प्रहारच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. 

तूर व हरभरा खरेदी चुकारे, पीकविमा, बोंड अळीच्या नुकसानीची भरपाई, गारपीट अनुदान या संदर्भाने आमदार कडू यांनी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आमदार कडू यांनी तूर व हरभरा चुकाऱ्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत शासनाकडून २९१ कोटी रुपयांपैकी २०१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. उर्वरित ९० कोटींपैकी ५० कोटी १४ जूनपर्यंत प्राप्त होणार असल्याचे कडू यांनी सांगितले. 

दरम्यान, किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले; याची माहिती त्यांनी आढावा बैठकीत घेतली. सर्वात आधी तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम ठरवून चुकारे दिले जात असल्याचे या वेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या वेळी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, महेंद्र जवंजाळ, मंगेश देशमुख, चंदू खेडकर, जोगेंद्र मोहोड, प्रदीप चौधरी, अनूप मारुळकर, नितीन व्यवहारे व इतरांची उपस्थिती होती.

बॅंकांच्या तक्रारींसाठी २३ ला जनता दरबार
पीकविमा, बोंड अळी, गारपीटची मदत त्यासोबतच कर्ज वितरणात बॅंकांकडून असहकार्य होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यासाठी प्रहारच्या वतीने २३ जूनला अमरावती येथील शासकीय विश्रामगृहावर जनता दरबार घेण्यात येणार आहे. या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या पीककर्जविषयक तक्रारी लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...