agrowon news in marathi, benefit of loan waiver scheme for banks, Maharashtra | Agrowon

कर्जमाफीचा पुन्हा बॅंकांनाच फायदा ः बच्चू कडू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

सोलापूर ःशेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा पुन्हा एकदा बॅंकांना झाला. शेतकरी कर्जमुक्त झाले नाहीत, उलट बॅंका मात्र मजबूत झाल्या, असा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

सोलापूर ःशेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा पुन्हा एकदा बॅंकांना झाला. शेतकरी कर्जमुक्त झाले नाहीत, उलट बॅंका मात्र मजबूत झाल्या, असा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी आमदार कडू सोलापुरात आले होते. ते म्हणाले, की मुद्रा लोनच्या माध्यमातून फक्त भाजपच्या लोकांना कर्ज दिले गेले. एकाही सामान्य रोजगाराला कर्ज मिळाले नाही. सोलापुरातील एखादे उदाहरण सांगा, की गरिबाला मुद्रा लोनच्या माध्यमातून कर्ज मिळाले आहे. तसे असल्यास ते उदाहरण मी सर्व राज्यभर देईन. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्याला कमी बॅंकेला जास्त झाला आहे. बॅंकांवर सरकारचे नियंत्रणच नाही. सगळ्यांची मिलीजुली आहे. शेतकरी मेला काय, जगला काय, त्याचे काही सोयरसूतक या शासनाला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत निर्णय न झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगातील सर्वांत मोठा पुतळा यवतमाळमध्ये उभारण्यात येईल.

सहकारमंत्र्यांच्या घराचा विषय अधिवेशनात मांडणार
सहकारमंत्र्याच्या बंगल्यासंदर्भात कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते काहीच बोलत नाहीत, या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, भाजपचा डीएनए तपासला तर त्यांच्यात अर्ध्यांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच नेते दिसतील. पूर्ण भाजप आता राहिलाच नाही. हे सगळे भाऊ भाऊ आहेत. सामान्य जनतेवर महापालिका कारवाई करते. मात्र, सहकारमंत्र्याच्या बंगल्याकडे दुर्लक्ष केले जाते. या बंगल्यासंदर्भात कारवाई करण्याच्या निष्कर्षापर्यंत महापालिका पोचेल असे वाटत नाही. त्यामुळे याप्रकरणी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...