agrowon news in marathi, block officer arrested in case of demanding sexual fever, Maharashtra | Agrowon

शरीरसुखाची मागणी करणारा गटसचिव अखेर गजाआड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

नायगाव येथील गटसचिव दादाराव इंगोले याच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर अटक करण्यात आली. ही माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ व जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली. चौकशीअंती निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
- प्रेम राठोड, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दारव्हा.

दारव्हा, जि. यवतमाळ : पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या गटसचिवाविरुद्घ गुन्हा नोंदविल्यानंतर अखेर त्याला मंगळवारी (ता.३) दारव्हा पोलिसांनी अटक केली. नायगाव येथे सोमवारी (ता. दोन) उघडकीस आलेल्या घटनेने सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दादाराव इंगोले, असे अटकेतील गटसचिवाचे नाव आहे. त्याला निलंबित करण्याची कार्यवाही प्रशासनाने तत्काळ हाती घेतली आहे. पीडित महिला नायगाव येथील रहिवासी असून, तिच्याकडे चार एक शेती आहे. शेतीपूरक जोडधंदा, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी पीडितेने महिला नातेवाईकाच्या माध्यमातून सदर गटसचिवाशी संपर्क साधला.

गटसचिवाने पाच नव्हे तर, दहा लाख रुपये कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले. पीडित महिलेने कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केला. मात्र, त्याला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी झाला. कर्ज मंजुरीबाबत महिलेने गटसचिवाला फोन केला असता, त्याने वारंवार शरीरसुखाची मागणी केली. हे संभाषण महिलेने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याने गटसचिवाचे बिंग फुटले. सोमवारी पीडितेने दारव्हा पोलिस ठाणे गाठून गटसचिवाविरुद्घ दारव्हा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर आज अटक केली.
 

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...