सोलापुरातील बोगस कृषी विद्यापीठाचा संस्थापक संचालक अण्णा इसुरे अटकेत

या प्रकरणाचा योग्य तो तपास आम्ही करत आहोत. लवकरच उर्वरित संशयितानाही अटक केली जाईल, गुन्हा दाखल झालेल्या चार संशयितांशिवायही अन्य कोणी लोक याप्रकरणाशी निगडित आहेत का, याची चौकशी सुरू आहे. सर्व बाजूने आमची चौकशी सुरू आहे. -विजय जाधव, पोलिस निरीक्षक, अक्कलकाेट पोलिस ठाणे
सोलापुरातील बोगस कृषी विद्यापीठाचा संस्थापक संचालक अण्णा इसुरे अटकेत

सोलापूर ः महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची कोणतीही मान्यता नसताना सोलापूर जिल्ह्यात बेकायदा बोगस राष्ट्रीय मागासवर्ग खुले कृषी विद्यापीठ स्थापन करून त्याअंतर्गत राज्यातील १४ जिल्ह्यांत बोगस कृषी विद्यालय चालवून विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक संचालकाला पोलिसांनी अखेर अटक केली. अण्णा इसुरे असे या संचालकाचे नाव असून, १३ जुलैपर्यंत न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.  कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी पाच दिवसांपूर्वीच या बेकायदा विद्यापीठावर अक्कलकोट पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तसेच ‘ॲग्रोवन' या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. तीन महिन्यांपूर्वीही एप्रिलमध्ये ‘ॲग्रोवन'ने या प्रकरणावरील कारवाईबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. पोलिसांनी आता या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासची चक्रे वेगाने फिरवली आहेत. त्यासाठी खास पथके रवाना करून यातील संशयितांचा शोध सुरू केला आहे. सध्या यातील प्रमुख संशयित आणि संस्थापक संचालक अण्णा इसुरे याला पोलिसांनी सोलापुरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अन्य संशयित डॉ. आशिष सर्जेराव ढोके (बोरखेडा बु., जि. बुलडाणा), विठ्ठल गवळी (चिखली रोड, येळगाव, जि. बुलडाणा) आणि बी. एस. पाटील (सोलापूर) यांच्या मागावरही पोलिस आहेत. दरम्यान, इसुरे याला अटकेनंतर पोलिसांनी अक्कलकोट न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी त्याच्या चौकशीसह या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली, तेव्हा न्यायाधीशांनी त्याला १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com