बीटी बियाण्यांच्या काही बॅचमधील बियाणे अप्रमाणित

बीटी बियाणे
बीटी बियाणे

अकोला ः या हंगामासाठी बीटी बियाणे कंपन्यांनी अकोल्यातील गोदामांमध्ये ठेवलेले सात वाणांचे काही बॅचमधील नमुने अप्रमाणित अाले अाहेत. याची विक्री थांबवण्याबाबत अादेश देण्यात अाले असून, यापैकी काही बियाणे बाजारात विक्री झाले काय, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी, की गुण नियंत्रक निरीक्षकांनी येथील एमअायडीसीमध्ये असलेल्या कापूस उत्पादक कंपन्यांच्या गोदामातील कापूस बियाण्यांचे नमुने घेतले होते. बीटी-जीन विश्लेषणाकरिता घेतलेले हे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता, त्यातील काही कंपन्यांचे नमुने विश्लेषणामध्ये अप्रमाणित आढळले अाहेत. याबाबतचा अहवाल यंत्रणांना मिळाल्यानंतर संबंधित कापूस उत्पादक कंपनीचे ‘त्या’ लॉटचे बियाणे विक्री न करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.   मिळालेल्या माहितीनुसार नुजीविडू, तुलसी व राशी या कापूस उत्पादक कंपन्यांचे हे बियाणे अाहे. एमआयडीसीतील गोदामात ठेवलेले सात वाण हे अप्रमाणित अाहेत, असा अहवाल दिला होता. बोंड अळी नियंत्रणासाठी संबंधित बियाण्यांमध्ये ९० टक्के बीटी जीन असणे गरजेचे अाहे; परंतु या बियाण्यांमध्ये ७० ते ९० टक्के यादरम्यात बीटी जीन असल्याचे प्रयोगशाळेने कळविले. त्यामुळे या बॅचमधील बियाणे खरेदी करू नये, असे अावाहन करणारे पत्र कृषी विभागाने अाता काढले अाहे.  कंपनीनिहाय वाण व बॅच क्रमांक नुजिविडू सीड्स ः prch३३१ (बॅच-०१८०३३८१७), prch७०१bt (१५७०४५९७६), NC३१०८ (१५८२०२०१६), NCH ९५४ (१५८०४३८४५), NCH ९०१५ (१५७०३९६१०) राशी सीड्स ः RCH७७९(१८०३२२१६३३) तुलसी सीड्स ः TCHH-२ (५४५४९८०७)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com