agrowon news in marathi, cases on co-operative society member, Maharashtra | Agrowon

राज्यातील सोसायट्यांच्या दहा हजार पदाधिकाऱ्यांवर होणार फौजदारी
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नाशिक : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना वाटप केलेले कर्ज वसूल होत नसल्याचा ठपका ठेवत संबंधित संस्थेच्या सुमारे १० हजार पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा सहकार विभागाने दिला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सुमारे ११०० सहकारी संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडायचे आहे. 

नाशिक : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना वाटप केलेले कर्ज वसूल होत नसल्याचा ठपका ठेवत संबंधित संस्थेच्या सुमारे १० हजार पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा सहकार विभागाने दिला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सुमारे ११०० सहकारी संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडायचे आहे. 

विविध कार्यकारी सहकारी संस्थांना नाबार्ड आणि जिल्हा बँकेमार्फत कर्जपुरवठा केला जातो. या माध्यमातून सहकारी संस्थांकडून पीककर्ज तसेच इतर कारणांसाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जाते. परंतु या कर्जाची परतफेड वेळीच होऊ न शकल्याने आजमितीस सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत.

मध्यंतरी शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीचा निर्णय घेतल्याने कर्जातून मुक्‍त होणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडच केली नाही. यामुळे आता हे कर्ज वसूल करण्यासाठी जिल्हा बँक आणि नाबार्डने सहकार खात्यामार्फत विविध कार्यकारी सोसायट्यांवरच कारवाई करण्याचे ठरविले आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ११०० सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सदस्य कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.

यासंदर्भात २१ जून रोजी निफाड सहकारी संस्थेचे सहायक निबंधक अभिजित देशपांडे यांनी निफाड तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून थकीत कर्जापोटी जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४६ अन्वये फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. निफाड सहकारी संस्थेप्रमाणे इतर तालुक्यांच्या सहायक निबंधकांनीही याचप्रकारे विविध कार्यकारी सोसायट्यांना नोटिसा बजावल्या आहेत. 

विविध कार्यकारी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या वैयक्‍तिक उपयोगासाठी घेतलेले कर्ज थकीत असून, समिती सदस्य म्हणून आपण संस्थेच्या सभासदांना म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज देण्याची शिफारस करून कर्ज मंजूर केले आहे. संबंधित सभासदांकडील कर्जदेखील थकीत आहे. यामुळे स्वत:साठी किंवा संस्थेच्या सभासदांच्या नो कर्ज देण्याची शिफारस करणे किंवा कर्ज मंजूर करणे हा अपराध असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...