agrowon news in marathi, cleanness massage from dindi, Maharashtra | Agrowon

पालखी सोहळ्यात चित्ररथातून स्वच्छतेचा जागर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

नगर ः आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसोबत संवाद साधत पालखी सोहळ्यातून स्वच्छतेबाबत जागृती केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे नगरसह राज्यातील १९ जिल्ह्यांमधील २० स्वच्छता रथ संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करणार आहेत. त्यासाठी चित्ररथ करण्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नगर ः आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसोबत संवाद साधत पालखी सोहळ्यातून स्वच्छतेबाबत जागृती केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे नगरसह राज्यातील १९ जिल्ह्यांमधील २० स्वच्छता रथ संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करणार आहेत. त्यासाठी चित्ररथ करण्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील लोकांनी वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर करावा, यासाठी अनेक वर्षांपासून जागृती केली जात आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक, अपंग व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना राज्य सरकारतर्फे अनुदानही दिले. ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे ‘हागणदारीमुक्त ग्रामपंचायत' हा उपक्रम राबविला जात आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी आळंदी (जि. पुणे) येथून प्रस्थान करणारी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व देहू (जि. पुणे) येथून निघणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात राज्यभरातील भाविक सहभागी होतात. त्यामुळे पालखी सोहळ्यातून स्वच्छतेबाबत जागृती केली जात आहे. 
पालखी सोहळ्यात स्वच्छता रथासोबत कथापथके असून, त्यांच्यामार्फत स्वच्छतेबाबत प्रबोधन केले जाणार आहे.

काही वर्षांपासून कलापथके, स्वच्छता रथाच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात जागृती करण्यास सुरवात झाली. त्याचा परिणाम म्हणून यंदा राज्यातील सर्व जिल्हा पूर्णपणे हागणदारीमुक्त झाला असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र गावे हागणदारीमुक्त झाली असली तरी स्वच्छतेबाबतचे महत्त्व कळावे, बांधलेल्या शौचालयाचा वापर करावा यासाठी पालखी सोहळ्यातून स्वच्छतेचा जागर उपक्रम कायम ठेवला आहे. सोमवारी (ता. ९) पुणे येथील विभागीय कार्यालयात चित्ररथाचे उद्‌घाटन होईल. २२ जुलैपर्यंत स्वच्छतेच्या जागराचा उपक्रम सुरू राहील. 

सहभागी जिल्हे
परभणी, बीड, वाशीम, उस्मानाबाद, सांगली, लातूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, जालना, ठाणे, अकोला, नगर, औरंगाबाद, अमरावती, तसेच सोलापूर जिल्ह्यांतील दोन स्वच्छता रथ सहभागी असतील.

नावे नसलेल्यांचाही होणार विचार
राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाने नुकतेच राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. ज्याची नावे बेसलाइन सर्व्हेत होती, त्यांनी शौचालये बांधल्याचे सांगत हागणदारीमुक्ती जाहीर केली. नावे असलेल्यांना प्रत्येकी बारा हजारांचे अनुदानही मिळाले. मात्र अजूनही अनेक कुटुंबाकडे शौचालये नाहीत. बेसलाइन सर्वेक्षणात त्यांची नावे आलेली नसल्याने त्यांना अनुदानही मिळाले नाही. आता अशा कुटुंबांचा सर्व्हे केला जात आहे. त्यातही अनेक गरीब कुटुंबे आहेत. सध्या सुरू असलेले सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्यामुळे त्यांनी शौचालय बांधावे यासाठी शासन स्तरावर अनुदान देण्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...