agrowon news in marathi, cloudy environment in Kokan central Maharashtra , Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोमवारी (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ढगांची रेलचेल झाली होती. आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन शुक्रवारपासून (ता. ६) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोमवारी (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ढगांची रेलचेल झाली होती. आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन शुक्रवारपासून (ता. ६) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकल्याने राज्यात पावसाचा जोर आेसरला आहे. पश्‍चिम किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि पूर्व किनारपट्टीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे सोमवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.

काेकणातील देवगड येथे सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मॉन्सूनचा आस गुरुवारपर्यंत उत्तरेकडेच राहणार आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाला पोषक हवामान होण्याचे संकेत अाहेत. शुक्रवारी राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

सोमवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग)

  • कोकण : मार्ग तम्हाणे ५८, रामपूर ५०, बुरवंडी ७०, दाभोल ५१, पटपन्हाले ४२, रत्नागिरी ६९, खेडशी ७७, फंसोप ५२, कोटवडे ४२, तरवल ४८, देवगड १११, मदुरा ४२.
  • मध्य महाराष्ट्र : उंदीरगाव ४६, कडेगाव ४४, हेळवाक २०, तापोळा २१, लामज ३३, अांबा २४, हेरे ३४. 
  • विदर्भ : चिखली ५१, केनवड २९, मालेगाव ३०, मुंगळा २०, मेडशी ३२, दवरगाव ४२, मोर्शी ४९, शिरखेड ३८, दत्तपूर २८, सावर ३२, खंडाळा २१, पुनवट २६, कायार २१, झरी जामनी ४३, खडकडोह २९, मुकुटबन २४, राळेगाव ३०, धानोरा २८, वाढोणा ५७, वडकी ४२, वरध २८, किन्ही ३८, बोरी ३३, वाडी २६, गोधनी २६, कामठी २३, काेरडी ५६, कान्हान ३१, निमखेडा ३८, चाचेर ३८, कोंढळी २३, परडसिंगा ४५, सावनेर ३३, केळवड २८, खापा ३५, बडेगाव ३०, भिवापूर ४४, कारेगाव ७०. भंडारा २०, बेला २९, खामारी ३१, तुमसर ५४, मिटेवणी ५६, कोंढा ४५, आमगाव ३५, सांगडी ४६. विरळी २४, बारव्हा ४४, मासाळ ५४, पालंदूर २१, रावणवाडी ३५, कामठा ४२, अामगाव ३९, तिगाव २०, ठाणा ३०, शिखारीटोळा २२, चंद्रपूर ३८, घुगस २७, पडोली ३१, बेंबळ ३३, वरोरा ४१, भद्रावती २५, चांदनखेडा २८, मांगळी ३८, धोडपेठ २३, चिमूर २४, शंकरपूर २२, गांगळवाडी २८, तालोधी ३८, राजूरा ५०, कोपर्णा ६२, गडचांदूर ३१, गडचिरोली ३०, पोरळा २२, ब्राह्मणी २५, अरमोरी ३०, पिसेवढ्या २१, आष्टी २०, बामणी ७३, जिमलगट्टा ४४, अल्लापाल्ली ६४, एटापल्ली २७, धानोरा ४०, चाटेगाव ३५. 

इतर अॅग्रो विशेष
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...