कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...

कर्जमाफी योजना
कर्जमाफी योजना

पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी साधण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जमधील चुका दुरुस्तीसाठी ‘एडिट आॅप्शन’ नसल्याचे कारणे देत शेतकऱ्यांची अडवणूक हाेत असल्याचे प्रकार समाेर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मनस्तापाला सामाेरे जावे लागत आहे.  वाळकी (ता. दाैंड) येथील शेतकरी सीताराम गणपत साळुंखे यांनी पारगाव येथील महा ई सेवा केंद्रामध्ये कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल केला. मात्र बचत खाते आणि कर्ज खाते क्रमांक ई सेवा आॅपरेटरने चुकविल्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरण्याची भीती आहे. याबाबत साळुंखे यांनी संबधित ई-सेवा आॅपरेटरला झालेली चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर संगणक प्रणालीमध्ये ‘एडिट आॅप्शन’ नसल्याचे कारण देत दुरुस्ती करता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे साळुंखे व्यथित हाेऊन दुसऱ्या ई-सेवा केंद्रामध्ये चाैकशीसाठी गेले; मात्र त्याही ठिकाणी त्यांना हाच अनुभव आला. संगणक प्रणालीमधील चुकांमुळे कर्जमाफीसाठी नाेंदणीसाठीच्या मुदतवाढीची संधी शेतकऱ्यांना साधता येत नसल्याचे चित्र आहे.

याबाबत बाेलताना सीताराम साळुंखे म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांच्या नावावर साडेतीन लाखांचे कर्ज असून, कर्जमाफीच्या याेजनेचा आॅनलाइन अर्ज भरताना आॅपरेटरद्वारे खाते क्रमांक भरताना चूक झाली; मात्र ही चूक सुधारण्यासाठी एडिट आॅप्शन नसल्याचे सांगत माझा अर्ज दुरुस्तीसाठी नकार दिला. अर्ज भरण्याची अथवा दुरुस्तीची मुदत जवळ येत असल्याने मला कर्जमाफीचा लाभ मिळणे अवघड झाले आहे.’’ ‘एडिट आॅप्शन’ सुरू : कटके संगणक प्रणालीमध्ये एडिट आॅप्शन सुरू करण्यात आले असून, अर्ज भरताना झालेल्या चुका दुरुस्त करता येणार आहेत. यामुळे महा ई सेवा केंद्रचालकांना आपल्या सर्व आॅपरेटरला याबाबत सूचना द्याव्यात. एकही शेतकऱ्याचा अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला जाऊ नये याबाबत दक्षता घ्यावी. नजरचुकीने अर्ज भरताना चुका झाल्या असतील, तर त्या चुका दुरुस्त करण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com