agrowon news in marathi, correction for onion issue, Maharashtra | Agrowon

कांदाप्रश्‍नी ‘करेक्शन’ करण्याच्या हालचाली सुरू
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

कांद्याची निर्यात वाढविण्यासाठी ७ टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यास केंद्रीय मंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एका वर्षात चारदा खाद्यतेलाचे आयातशुल्क सरकारने वाढविले. सोयाबीन पेंडीच्या बांगलादेशमधील निर्यातीसाठी रेल्वे रेक देण्याची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कबुली दिली. दूध पावडर प्रश्‍नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली आहे. 
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग

नाशिक : लोकसभेच्या आगामी निवडणुकांकडे लक्ष लागलेल्या केंद्र सरकारने आता शेतीमाल आणि त्यातही विशेषत: कांदाप्रश्‍नी ‘करेक्‍शन’ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कांदा, सोयाबीन, दुधाची पावडर यासंबंधीच्या प्रश्‍नांवर मंगळवारी (ता. १९) नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू यांच्यासमवेत कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची महत्त्वपूर्ण बैठक यासंदर्भात झाल्यानंतर कांदा उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत.

कांदा, सोयाबीन, दुधासंबंधीच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिल्लीत संपर्क साधत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांमध्ये लक्ष घालण्याची विनंती केंद्रीय मंत्र्यांना केली. त्यानुसार झालेल्या बैठकीत पाशा पटेल यांनी कांदा, सोयाबीन, दुधासंबंधीच्या सरकारपुढे ठेवलेल्या मागण्या अशा ः 

  •  पाकिस्तानच्या १० टक्‍क्‍यांनी स्वस्त कांद्याच्या स्पर्धेत उतरण्यासाठी कांदा निर्यातीवर ७ टक्के प्रोत्साहन अनुदान द्या 
  •  सोयाबीन पेंडवर ७ टक्‍क्‍यांवरून १० टक्के निर्यात अनुदान देण्यात यावे आणि ४० लाख टन पेंडीची निर्यात करावी 
  •  बांगलादेशात आठ लाख टन सोयाबीन पेंड पाठविण्यासाठी रेल्वेच्या ३०० रेक उपलब्ध करून देण्यात याव्यात 
  •  दुधाच्या पावडर निर्यातीस किलोला २५ ते ३० रुपये अनुदान द्यावे. बटर-तुपाचा जीएसटी १२ वरून ५ टक्के करावा 
  •  माध्यान्ह भोजनात दुधाचा वापर वाढविण्यासंबंधीचा गंभीरपणे विचार सरकारने करावा. 

देशातील कांद्याची निर्यात (आकडे टनांत)    

 वर्ष       निर्यात 
२०१२-१३ १८ लाख २२ हजार 
२०१३-१४  १३ लाख ५८ हजार 
२०१४-१५  १० लाख८६ हजार 
२०१५-१६ ११ लाख १४ हजार 
२०१६-१७     ३४ लाख ९२ हजार 
२०१७-१८    २१ लाख ३५ हजार

(देशात यंदा ११० लाख टनापर्यंत कांद्याचे उत्पादन अपेक्षित असून, खाण्यासाठी लागणारा कांदा वगळता २० लाख टन अतिरिक्त कांदा होणार.) (गेल्या वर्षी जानेवारी ते मेपर्यंत महिन्याला तीन ते चार लाख टन कांद्याची निर्यात व्हायची. यंदा महिन्याला एक ते सव्वा लाख टन कांद्याची निर्यात होते.) 

प्रतिक्रिया
निर्यात खुली ठेवताना प्रोत्साहन अनुदान पाच टक्के देण्यात येत होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी वीस वर्षांतील सर्वाधिक निर्यात झाली. आता कांद्याचे उत्पादन अधिक असल्याने आणि भाव पडल्याने निर्यात हा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच पूर्वीप्रमाणे पाच टक्के प्रोत्साहन अनुदान ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात यावे, अशी मागणी वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली आहे. 
- डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री 

 

    

 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...