agrowon news in marathi, corruption Pounded to KEM project, Maharashtra | Agrowon

‘केम’प्रकल्पाला पोखरले भ्रष्टाचाराने
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

अमरावती  ः शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व त्या माध्यमातून आत्महत्या नियंत्रणात आणणे या उद्देशाने रोम सरकारच्या कर्ज रकमेतून अंमलबजावणी झालेला प्रकल्प गैरव्यवहाराने पोखरला गेला. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरने गैरव्यवहाराच्या कारणावरून १० कोटी देण्याचे नाकारले. कारवाईसाठी १५०० पानांचा अहवाल सरकारला सादर झाला, त्यानंतरही तत्कालीन प्रकल्प संचालकावर कारवाई होत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अमरावती  ः शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व त्या माध्यमातून आत्महत्या नियंत्रणात आणणे या उद्देशाने रोम सरकारच्या कर्ज रकमेतून अंमलबजावणी झालेला प्रकल्प गैरव्यवहाराने पोखरला गेला. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरने गैरव्यवहाराच्या कारणावरून १० कोटी देण्याचे नाकारले. कारवाईसाठी १५०० पानांचा अहवाल सरकारला सादर झाला, त्यानंतरही तत्कालीन प्रकल्प संचालकावर कारवाई होत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

‘इफाड’च्या माध्यमातून ४०० कोटी रुपयांचा प्रकल्प आत्महत्या नियंत्रणासाठी विदर्भाकरिता प्रस्तावित करण्यात आला. या प्रकल्पाच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आली. काटोल येथील एका संस्थेच्या विरोधात अकोला येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हीच संस्था कधीकाळी केम प्रकल्पात मोर्शी क्‍लस्टरमध्ये काम करताना ब्लॅकलिस्ट झाली होती. त्यानंतर केवळ तत्कालीन संचालकाचे निकटवर्तीय असल्याच्या निकषावर या संस्थेला काम देण्यात आले. एक कोटी ५७ लाख रुपयांचे काम या संस्थेला देण्यात अाले. 

‘सोलॅस' या डेअरी प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीची १६ ऑगस्ट २०१७ रोजी स्थापन झाली. कंपनीच्या स्थापनेला अवघा एक दिवसाचा कालावधी झाला असताना या संस्थेला १८ ऑगस्टला तब्बल ९० लाख रुपयांची कामे देण्यात आली. या कंपनीच्या संचालक मंडळात तत्कालीन संचालकांच्या पत्नीचा समावेश असल्यानेच ही मेहरनजर दाखविण्यात आली, असेही सांगितले जाते. अशा अनागोंदीचा कळस या प्रकल्पाने गाठल्याचे थेट चौकशीत समोर आले. आमदार वीरेंद्र जगताप, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी देखील हा मुद्दा लावून धरला.

त्यानंतर चौकशी समिती गठीत होत १५०० पानांचा अहवाल तयार झाला. मात्र, तत्कालीन संचालकाचे मंत्रालयस्तरावर असलेल्या संबंधामुळे या प्रकरणी कारवाई पुढे सरकत नसल्याचा आरोप आहे. इफाडनेदेखील या प्रकल्पातील १० कोटी रुपयांचा निधी नामंजूर केला आहे. 

दरम्यान, मी या आरोपांसंदर्भात विभागीय आयुक्तांकडे खुलासा केला आहे, असे प्रकल्पाचे तत्कालीन संचालक गणेश चौधरी गणेश चौधरी यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...