agrowon news in marathi, criteria changed for cow milk , Maharashtra | Agrowon

गाय दुधाचे गुणप्रत निकष बदलले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या गुणप्रतीचे निकष शासनाने बदलले आहेत. यापुढे ३.२ टक्के फॅट आणि ८.३ टक्के एसएनएफ असलेले गाय दूध प्रतिलिटर २६.१० रुपये दराने खरेदी केले जाणार आहे. 

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या गुणप्रतीचे निकष शासनाने बदलले आहेत. यापुढे ३.२ टक्के फॅट आणि ८.३ टक्के एसएनएफ असलेले गाय दूध प्रतिलिटर २६.१० रुपये दराने खरेदी केले जाणार आहे. 

दूध उत्पादक कल्याणकारी संघाने राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या शेतकऱ्यांकडून गाय दुधाची खरेदी करताना ३.५ टक्के फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ असावा, असा नियम आहे. तसेच, गाय दूध २७ प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचे आदेश आहेत. शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करताना फॅट आणि एसएनएफचे निकष काटेकोरपणे पाहिले जातात, मात्र भाव दिला जात नाही. शेतकऱ्यांची ही लूट थांबविण्याची मागणी वारंवार राज्य शासनाकडे केली जात होती. 

‘‘राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या समितीने गुणप्रत बदलण्याची शिफारस केली होती. ती आता स्वीकारण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळू शकेल,’’ अशी माहिती दुग्धविकास विभागाच्या सूत्रांनी दिली. 

टोन्ड दूध बंद करा ः डेरे 
शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबविण्यासाठी शासनाने उशिरा की होईना हा निर्णय घेतल्यामुळे दूध उत्पादक या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. तथापि आता टोन्ड दुधाचा प्रकार बंद करण्याची गरज आहे, असे मत दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केले. 

दर्जा सुधारण्याची गरज होती ः कुतवळ
राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, की कमी गुणप्रतीचे दूध कायदेशीरदृष्ट्या स्वीकारणे यामुळे सोपे झाले आहे. मात्र, दुधाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज होती. कमी दर्जाचे दूध चांगले आहे असे समजून हा निर्णय झाला असला तरी त्यामुळे गैरप्रवृत्तींचे फावणार आहे.

अशी राहील गाय दुधाची सुधारित गुणप्रत व नवे दर

फॅट एसएनएफ   दर प्रतिलिटर रुपये
३.२    ८.३  २६.१०
 ३.३     ८.३   २६.४०
३.४   ८.३  २६.७०
३.५   ८.३    २७.००
३.६   ८.३   २७.३०
३.७   ८.३ २७.६०
३.८   ८.३  २७.९०
३.९     ८.३    २८.२०
४.०     ८.३   २८.५०
४.१  ८.३  २८.८०
४.२    ८.३    २९.१०
४.३   ८.३  २९.४०
४.४  ८.३  २९.७०
४.५   ८.३      ३०.००

 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...