agrowon news in marathi, crop loan problem , on the spot report, Maharashtra | Agrowon

बॅंकेच्या चकरा अन् कागदपत्रांच्या जंत्रीतच होताहेत पैसे खर्च
चंद्रकांत जाधव
शनिवार, 23 जून 2018

धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी बॅंकेत चकरा मारीत आहोत. वाढीव कर्ज बॅंका देण्यास तयार नाहीत. सर्च रिपोर्ट, स्टॅम्प आदींसाठी पैसे खर्च होत आहेत. आणखी नवनव्या कागदपत्रांची मागणी बॅंक करते. सध्या तर बॅंकेचे साहेब जागेवर सापडत नाहीत. पीककर्ज मिळणार केव्हा. सावकाराकडून दोन रुपये प्रतिशेकडा दराचे कर्ज घेण्याची वेळ या बॅंकांनी आणली आहे. पावसाप्रमाणेच बॅंकांही शेतकऱ्यांबाबत लहरीपणा दाखवत आहेत, अशी हतबलता शेतकरी व्यक्त करत होते. 

धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी बॅंकेत चकरा मारीत आहोत. वाढीव कर्ज बॅंका देण्यास तयार नाहीत. सर्च रिपोर्ट, स्टॅम्प आदींसाठी पैसे खर्च होत आहेत. आणखी नवनव्या कागदपत्रांची मागणी बॅंक करते. सध्या तर बॅंकेचे साहेब जागेवर सापडत नाहीत. पीककर्ज मिळणार केव्हा. सावकाराकडून दोन रुपये प्रतिशेकडा दराचे कर्ज घेण्याची वेळ या बॅंकांनी आणली आहे. पावसाप्रमाणेच बॅंकांही शेतकऱ्यांबाबत लहरीपणा दाखवत आहेत, अशी हतबलता शेतकरी व्यक्त करत होते. 

पीककर्जासंबंधी शेतकऱ्यांना काय अनुभव, अडचणी येत आहेत, यासंबंधी ‘ॲग्रोवन’ने गुरुवारी (ता. २१) दुपारी धुळे जिल्ह्यातील बेटावद (ता. शिंदखेडा) येथील स्टेट बॅंकेनजीक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. बॅंकेत मोठी गर्दी दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत होती. अनेक शेतकरी आले होते. बेटावद परिसरातील सुमारे १२ ते १३ गावांचा व्यवहार या स्टेट बॅंकेत आहे. शेतकऱ्यांशी संवादानंतर अनेक धक्कादायक मुद्दे समोर आले. 

पाच लाख फेडायची पत, पण चार महिने वणवण
स्टेट बॅंकेत डोंगरगाव (ता. शिंदखेडा) येथील अरूण बापू पाटील हे नव्याने पीककर्ज घेण्यासाठी आले होते. ते म्हणाले, चार महिने बॅंकेभोवती फिरत आहे. एक हेक्‍टर ९२ आर क्षेत्र आहे. मागील वर्षी खासगी बॅंकेचे कर्ज घेतले होते. पाच लाख रुपये वेळेत परतफेड केली. आता स्टेट बॅंकेकडून कर्ज घेऊ म्हणून संबंधितांना भेटलो. त्यांनी जी कागदपत्र मागितली ती आणली. मध्येच विहिरीची नोंद नाही म्हटले. मग विहिरीबाबतचा स्टॅम्प तयार केला. सहा हजार रुपये खर्ची घातले. पण, अजून बॅंकेने पीककर्ज दिलेले नाही. साहेब नाहीत, असे आता सांगितले जाते. 

व्याजाने पैसे घेण्याची वेळ 
वाघळी (ता. शिंदखेडा) येथील ईश्‍वर नानाभाऊ माळी हे कर्जमाफीचे लाभार्थीही पीककर्जापासून अजून वंचित आहे. दीड लाख कर्ज माफ झाले. त्यावरील व्याज व इतर रक्कम म्हणून फेब्रुवारीतच ३२ हजार रुपये भरले. सहा एकर बागायती कापूस आहे. पीककर्जाच्या प्रस्तावासाठी पाच हजार खर्च केले. बॅंकवाले किती कर्ज मला मिळेल, हे सांगत नाहीत. घरी मुलगा व मुलगी आहे. ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांच्यासाठी पैसे लागतील. हंगाम उभा केला. त्यासाठी निधी हवा आहे. परंतु, वेळेत कर्ज मिळाले नसल्याने सावकाराकडून दोन रुपये प्रतिशेकडा दराचे पैसे घेण्याची वेळ आली आहे. किती दिवस वणवण करायची व पैसे खर्च करायचे, यालाही मर्यादा आहे, असे ईश्‍वर माळी म्हणाले. 

जिल्हा बॅंक कमी कर्ज देते, म्हणून स्टेट बॅंकेकडे आलो
बेटावद (ता. शिंदखेडा) येथील अशोक पुंडलीक वाणी हेदेखील कर्जासाठी आपल्या मुलासोबत आले होते. त्यांनी सांगितले, की धुळे - नंदुरबार जिल्हा बॅंक हवे तेवढे कर्ज शेतीवर देत नाही. त्यांचे ६० हजार रुपये कर्ज भरले. नीलचा दाखला घेतला आहे. माझे नऊ एकर व पत्नीचे १.४७ हेक्‍टर बागायती क्षेत्र आहे. आमच्या दोघांचे पीककर्जासाठीचे प्रस्ताव तयार करीत आहे. आता कितीही खर्च लागला तर तो कागदपत्रांसाठी करावाच लागेल. पाहू, प्रयत्न तर करावेच लागतील. 

वाढीव कर्जाला नकार
स्टेट बॅंकेत कुठल्याशा कामानिमित्त आलेले पाष्टे (ता. शिंदखेडा) येथील दिलीप तुकाराम भदाणे यांनाही वाढीव पीककर्ज मिळत नसल्याचे समोर आले. ते म्हणाले, माझी ८० आर शेती आहे. मी मुळावद (ता. शिंदखेडा) येथील पंजाब नॅशनल बॅंकेचा नियमित कर्जदार आहे. ४० हजार कर्ज त्यांनी दिले होते. ते पुन्हा भरले. आता वाढीव कर्जाची मागणी बॅंकेकडे केली, पण ते मिळालेले नाही. त्यांनी मूल्यांकन करून आणा, असे सांगितले आहे. त्याच्या गडबडीत फिरत आहे. पीककर्ज हे जूनपूर्वीच शेतकऱ्याला मिळावे. उशिराने हाती पैसा आला तर तो शेतीच्या फारशा उपयोगाचा नसतो. 

साहेब म्हणतात मी शासकीय कामात...
वाघाळी (ता. शिंदखेडा) येथील एकनाथ भास्कर खैरनार हेदेखील आपल्या आईवडीलांच्या पीककर्जासंबंधी दोन महिन्यांपासून फिरत आहे. ते म्हणाले, माझे वडील भास्कर भबुतराव खैरनार व आई रंजनाबाई खैरनार यांच्या नावे बागायती शेती आहे. वडिलांच्या ५० आर व आईच्या ६२ आर क्षेत्रासंबंधी पीककर्ज घेतले होते. वडिलांच्या नावे ११ हजार व आईच्या नावे १० हजार ७०० रुपये कर्ज भरले. पण नवीन पीककर्ज देत नाहीत. चार दिवस बॅंकेत येत आहे, पण बॅंकेत साहेबच जागेवर नाहीत. शेवटी साहेबांशी मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी मी शासकीय कामात आहे, असे म्हटले.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक...
बळी ः अफवांचे अन्‌ अनास्थेचेहीधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात राईनपाडा...
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटपऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
बोंड अळी, तुडतुड्यामुळे नुकसानग्रस्त...नागपूर : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे...
दुध आंदोलनाची धग कायमपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ...
दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची...नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा...
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा...नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार...
पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे...पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू...
नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे...