agrowon news in marathi, demand of make sugar quota at 80 lakh ton, Maharashtra | Agrowon

साखर निर्यातीचा कोटा ८० लाख टन करण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

कोल्हापूर : साखर निर्यातीची कोटा ८० लाख टन करावा. यासाठी अठरा महिन्यांची मुदत द्यावी. याचबरोबर उसाला १०० रुपये प्रतिटन अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्र शासनाचे अन्न सचिव रविकांत व प्रमुख साखर संचालक श्री. साहू यांची भेट घेऊन ही मागणी केली. 

कोल्हापूर : साखर निर्यातीची कोटा ८० लाख टन करावा. यासाठी अठरा महिन्यांची मुदत द्यावी. याचबरोबर उसाला १०० रुपये प्रतिटन अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्र शासनाचे अन्न सचिव रविकांत व प्रमुख साखर संचालक श्री. साहू यांची भेट घेऊन ही मागणी केली. 

केंद्राने नुकतेच ४०४७ कोटी रुपयांचे पॅकेज या उद्योगासाठी जाहीर केले आहे. याच बरोबर किमान साखर विक्रीदर बांधणे, तीस लाख टनांचा राखीव साठा करणे आदी निर्णय घेतल्याने बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली. याचा सकारात्मक परिणाम उद्योगातील सर्वच घटकांवर झाला. परिणामी कारखान्यापुढील अपुऱ्या दुराव्याचे संकट दूर होण्यास मदत होत असल्याचे श्री. वळसे पाटील यांनी सांगितले. 

 इथेनॉलनिर्मिती क्षमतावाढीसाठी पॅकेजमध्ये तरतूद केली असली, तरी इथेनॉलचा सध्याचा दर ४०.८५ रुपये प्रतिलिटर आहे यात वाढ अपेक्षित असल्याचे वळसे पाटील यांनी निर्दशनास आणून दिले. श्री. रविकांत यांनी साखर उद्योगाच्या क्षेत्रात पहिल्यांदाच इतकाच ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले. साखर दराचा वेळोवेळी निर्णय घेऊन दरात वाढ करण्याचा अधिकार विभागाने राखून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोणत्याही कारखान्याने विक्रीत २९०० रुपये प्रतिक्विंटल रुपयांच्या खाली विकता कामा नये तसेच दिलेल्या निर्यातीच्या लक्ष्याची पूर्ती होणे गरजेचे असल्याचे श्री. रविकांत यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...