agrowon news in marathi, demand for SIT of HT seed inquiry, Maharashtra | Agrowon

एचटी बियाणे ‘एसआयटी’ला मुदतवाढीची मागणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

नागपूर : राज्यात अवैधरीत्या पुरवठा होणाऱ्या एचटी बियाण्यांची पाळेमुळे खोदण्यासाठी नेमलेल्या विशेष चौकशी पथकाचे (एसआयटी) काम नियोजीत वेळेत पूर्ण न झाल्याने या एसआयटीला मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी निर्णय घेणार असून त्यांच्या सहमतीनंतरच या पथकाला मुदतवाढ मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगीतले. 

नागपूर : राज्यात अवैधरीत्या पुरवठा होणाऱ्या एचटी बियाण्यांची पाळेमुळे खोदण्यासाठी नेमलेल्या विशेष चौकशी पथकाचे (एसआयटी) काम नियोजीत वेळेत पूर्ण न झाल्याने या एसआयटीला मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रकरणी निर्णय घेणार असून त्यांच्या सहमतीनंतरच या पथकाला मुदतवाढ मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगीतले. 

केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याअंतर्गत असलेल्या जनुकीय अभियांत्रिकी मान्यता समितीने एचटी (हर्बीसाईड टॉलरंट) बियाण्याच्या प्रसारणाला मान्यता दिलेली नाही. त्यानंतरसुद्धा राज्यात गेल्यावर्षीच्या हंगामात सुमारे २५ लाख एचटी कपाशी बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला होता.

गुजरात, आंध प्रदेश, तेलंगणा राज्यात अनधिकृतपणे या बियाण्यांचे बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. तेथून महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यातून मग हे बियाणे विविध भागात पोचविले जाते. त्याकरिता एजंट म्हणून शेतकऱ्यांचाच वापर केला जातो, अशी माहिती आहे. यावर्षी कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने याविरोधात व्यापक मोहीम राबविली. त्यानंतरसुद्धा यावर्षीच्या हंगामात ४० ते ४५ लाख पाकिटे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे.

कारवाई करणार
एचटी बियाण्यांची उगमस्थानेच शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या विचारात महाराष्ट्र सरकार आहे. त्याकरिता विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश तसेच अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे अशा दोघांचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करण्यात आली. जून महिन्यात ही समिती आपला अहवाल शासनाला देणार होती. परंतु, अपेक्षित काम न झाल्याने समितीने कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे. खरिप हंगामाची सुरवात झाली आहे आणि पाऊस नाही. परिणामी शेतकऱ्यांपर्यंत भविष्यात आपत्कालीन उपाययोजना पोचवाव्या लागतील, त्यामुळे मुदतवाढ मिळावी, असे म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भाने निर्णय घेणार असून त्यांच्या स्वाक्षरीनंतरच हा प्रस्ताव मार्गी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगीतले.

आयसीएसआर मध्ये चौकशी
विशेष चौकशी पथकाने केंद्रीय कृषी मंत्रालय ते भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएसआर) अशा सर्व ठिकाणांहून या संदर्भाने तथ्य गोळा केल्याचे वृत्त आहे. चौकशीअंती मोठा गौप्यस्फोट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...