agrowon news in marathi, Dhaondge says late for crop loan is a government fault, Maharashtra | Agrowon

पीककर्ज वेळेवर न वाटण्यामागे सरकारचे षड्‍यंत्र ः धोंडगे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

नांदेड : खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असताना बॅंकांनी आजवर उद्दिष्टाच्या दहा टक्केसुद्धा कर्ज वाटप केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही. या मागे सरकारचे षड्‍यंत्र असल्याची टीका राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य प्रमुख तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली.

नांदेड : खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असताना बॅंकांनी आजवर उद्दिष्टाच्या दहा टक्केसुद्धा कर्ज वाटप केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही. या मागे सरकारचे षड्‍यंत्र असल्याची टीका राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य प्रमुख तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली.

श्री. धोंडगे म्हणाले, की राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. ती एवढी फसवी ठरली आहे की आजवर 10 ते 15 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. वर्षभरात कर्जमाफी योजनेचे निकष बदलण्यात आले. त्यामुळे बॅंकांही संभ्रमात असून, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्यभरात पीक कर्जवाटप अत्यंत संथ गतीने सुरू आहे. राष्ट्रीयकृत बॅंका कर्ज देण्यास निरुत्साही असतात. त्यात सरकारने कर्जमाफीचा घोळ घातल्याने ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शेतीमालाचे भाव निच्चांकी पातळीवर असताना तसेच आवश्यकता नसताना शेतीमालाची आयात केली जात आहे. यामुळे शेतकरी आर्थिक दिवाळखोरीत निघाला आहे. पीक विम्याचा गाजावाजा करुनही नुकसान भरपाईबद्दल 25 टक्के रक्कमदेखील पदरात पडते की नाही याबाबत शंका आहे. वेळेवर पीक कर्जपुरवठा झाला नाही तर अनेक पटीने व्याज घेणाऱ्या सावकारांकडे जाण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. राज्यातील युती सरकारची तीच इच्छा आहे. सुलभ कर्ज  वाटप योजना अवघड झाली आहे. या मागे सरकारी षड्‍यंत्राचा भाग आहे अशी टीका श्री. धोंडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...