agrowon news in marathi, diploma in agriculture polytechnic will cancel, Maharashtra | Agrowon

कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम रद्द होणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018

कृषी परिषदेला कृषी विद्या परिषदेमार्फत प्राप्त झालेल्या शिफारशींना अंतिम स्वरूप देण्यात येईल. महिनाभराच्या आत याबाबत अधिकृत माहिती संस्थाचालक व विद्यार्थी, पालकांना देण्यात येईल.  
- डाॅ. हरिहर कौसडीकर, संचालक, शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे. 

पुणे ः गेल्या पाच वर्षापासून कृषी विद्यापीठांमार्फत चालविण्यात येणारा तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम लवकरच बंद करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या पदविकेला व्यावसायिक दर्जा मिळाला होता. तीन वर्षांच्या या पदविकेबाबत राज्यातील विद्यापीठांकडे अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यावर चारही कृषी विद्यापीठांनी पदविका अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र कृषी परिषदेकडे केली आहे. येत्या आठवडाभरात या निर्णयावर परिषदेकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर हा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून रद्द होणार आहे.

राज्यात  विविध ठिकाणी चारही कृषी विद्यापीठांतर्गत मराठी भाषेतून दोन वर्षांचा कृषी पदविका अभ्यासक्रम, तर सेमी इंग्रजी स्वरूपात तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतन व चार वर्षांचा कालावधी असलेला कृषी पदवी अभ्यासक्रम चालविण्यत येतो. मात्र, जानेवारी महिन्यात शासनाने काढलेल्या निर्णयानुसार कृषी तंत्रनिकेतन हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालू ठेवण्याबाबत कृषी विद्यापीठाच्या विद्यापरिषदांना अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार कृषी विद्यापीठांनी हा पदविका अभ्यासक्रम पूर्णत रद्द करण्याची शिफारस परिषदेला केली आहे. त्यामुळे लवकरच या पदविका अभ्यासक्रम रद्द होण्यावर शिक्कामोर्तब होणार असून, या वर्षापासून पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविल्या जाणार नाहीत.

तसेच यंदा २०१८-१९ या चालू वर्षापासून तीन वर्षांचा कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश घेता येणार नाही. राज्यात फक्त दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू राहील.

जुलै २०१७ मध्ये कृषी शिक्षणाला व्यावसायिक दर्जा मिळाला आहे. त्यानुसार पदवीच्या प्रथम वर्षात केवळ सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेने राज्यात २०१७-१८ पासून पाचव्या अधिष्ठाता समितीनुसार अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली आहे. कृषी विद्यापीठाच्या मते कृषी तंत्रनिकेतन पदविका पूर्ण केलेले विद्यार्थी हा नवीन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पात्र ठरत नाही. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी याबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचेदेखील विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.    

दुसऱ्या, तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळणार
तीन वर्षांच्या सेमी इंग्रजी कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यंदा दुसऱ्या वर्षात आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळणार आहे. त्या संबंधीचा अभ्यासक्रम पुढील दोन वर्षांत पूर्ण करून घेतला जाणार आहे. मात्र, 2020-21 मध्ये हा पूर्ण अभ्यासक्रम बंद केला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...