agrowon news in marathi, document checking of soalpur APMC by police, Maharashtra | Agrowon

सोलापूर बाजार समितीकडील कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन सभापतींसह ३७ जणांवर सुमारे ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आता तपासकामाला सुरवात केली असून, या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी नुकतीच बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन या प्रकरणातील काही कागदपत्रांची तपासणी केली. गुन्हा दाखल झालेल्या सभापतींसह संचालकांवर कोणत्याहीक्षणी अटकेची कारवाई होऊ शकते, त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन सभापतींसह ३७ जणांवर सुमारे ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आता तपासकामाला सुरवात केली असून, या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी नुकतीच बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन या प्रकरणातील काही कागदपत्रांची तपासणी केली. गुन्हा दाखल झालेल्या सभापतींसह संचालकांवर कोणत्याहीक्षणी अटकेची कारवाई होऊ शकते, त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०११ ते २०१६ या कालावधीत ३९ कोटी सहा लाख ३९ हजार १९३ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने,  इंदुमती अलगोंडा यांच्यासह ३७ जणांवर विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांच्या तक्रारीवरून मंगळवारी (ता. २२) जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

बाजार समितीत १ एप्रिल २०११ ते १७ ऑक्‍टोबर २०११ या कालावधीत १४ समिती सदस्य, एक सचिव आणि १८ ऑक्‍टोबर २०११ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत २० समिती सदस्य आणि दोन सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांत दाखल झालेल्या या प्रकरणामुळे बाजार समितीतील राजकारण वेगळ्याच वळणावर आले आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यातील परंपरागत राजकीय लढाई असे काहीजण याचे वर्णन करत आहेत. तर काही जण गैरव्यवहार झालाच आहे, त्यामुळे अशीच कारवाई अपेक्षित आहे, असे म्हणत या कारवाईचे समर्थन करत आहेत.

पोलिसांनीही या कामात सर्वाधिक लक्ष घालून तातडीने कामकाजाला सुरवात केली आहे. पोलिसांच्या या हालचाली पाहून तत्कालीन सभापतींसह काही संचालक सध्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असताना ‘टूर’वर असल्याचे सांगण्यात येते.

इतर अॅग्रो विशेष
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
कडवंची : हमखास मजुरी देणारं गावद्राक्षबागांमुळे कडवंची गावात बारमाही रोजगार तयार...
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : डाळिंबात तयार केली ओळखकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर...
कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी...द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच...कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई...विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोडप्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील...
कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं...कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी...
कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून...काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात...
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेलकडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...