agrowon news in marathi, Dr. mhaisekar says, brim whom will not work, Maharashtra | Agrowon

जनतेची कामे टाळणाऱ्यांना माझ्यापुढे आणा : डॉ. म्हैसेकर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 जुलै 2018

पुणे: जनतेची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना माझ्या बैठकांना पाठवा. मी त्यांच्या समस्या जाणून घेईल. मात्र, सांगूनही असे अधिकारी जनतेची कामे हेतूतः टाळत असल्यास अशा अधिकाऱ्यांची पुढे अडचण होऊ शकते, असा स्पष्ट इशारा पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. 

पुणे: जनतेची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना माझ्या बैठकांना पाठवा. मी त्यांच्या समस्या जाणून घेईल. मात्र, सांगूनही असे अधिकारी जनतेची कामे हेतूतः टाळत असल्यास अशा अधिकाऱ्यांची पुढे अडचण होऊ शकते, असा स्पष्ट इशारा पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. 

विभागीय आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर डॉ. म्हैसेकर यांनी महसूल तसेच ग्रामविकासाच्या कामांना चालना देण्यास सुरवात केली आहे. स्वतः कार्यालयांना भेटी देत कामाची पद्धत समजावून घेणे, चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि कामचुकार कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करणे अशी धडाकेबाज पद्धत त्यांनी सुरू केली आहे.

झिरो पेन्डसीचे तुणतुणे पुणे विभागात वाजविले जात असताना डॉ. म्हैसेकर यांना स्वतःच्याच कार्यालयात काही जुन्या फाईल्स मिळाल्या. ‘‘खालच्या कर्मचाऱ्यांनी किती   फाईल्स रखडवून ठेवल्या हे बघताना   तुम्ही स्वतः आधी आपले कार्यालय तपासून पहा. लोकांच्या कामाच्या कोणत्याही फाईल्स बाजूला ठेवू नका,’’ अशा स्पष्ट सूचना त्यांनी महसूल उपायुक्त तसेच खातेप्रमुखांना दिल्या आहेत. 

कृषी खात्यानंतर शेतकऱ्यांचा सर्वांत जास्त संबंध महसूल खात्याशी येतो. सातबारा काढण्यापासून ते फेरफार नोंदीसाठी महसूल कार्यालयाचा वाईट अनुभव शेतकऱ्यांना येतो. डॉ. म्हैसेकर यांनी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेला त्यांच्या हक्क्याच्या सेवा व्यवस्थित मिळण्यासाठी आग्रह धरला आहे. 
‘‘लोकांच्या कामाशी संबंधित चेकलिस्ट तयार करा आणि झालेली कामे तपासण्यासाठी क्रॉसचेकिंग करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

एका भेटीत त्यांना एका प्रकल्पग्रस्ताला त्याच्या कामासाठी दहा वेळा चकरा माराव्या लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पंचायत समित्या, तहसील कचेऱ्या तसेच जिल्हा परिषदा आणि जिल्हाधिकारी कार्यालयांनी गतिमान कामे करावीत तसेच जुनी प्रकरणे निकाली काढावीत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सूचित केले आहे. 

जनतेला पोचदेखील देत नाहीत
काही सरकारी कार्यालयांमध्ये विविध सेवा तसेच तक्रारींसाठी आलेल्या अर्जावर पोच न देण्याचे धोरण ठेवले जाते. त्यामुळे या अर्जाचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे कार्यालयात लोकांकडून आलेला प्रत्येक कागद हा नोंदवून त्याचे रेकॉर्ड ठेवा, अशाही सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल...वाशीम   ः या मोसमात जिल्ह्यात आतापर्यंत...
पुणे जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्‍टरवर...पुणे   ः जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात...
सातारा जिल्ह्यातील सहा धरणांतून विसर्ग...सातारा   ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून...