agrowon news in marathi, election of solapur APMC, Maharashtra | Agrowon

आठ दिवसांपूर्वी तत्कालीन संचालकांवर गुन्हे, सातव्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह संचालक, सचिव आदी ३७ जणांवर सुमारे ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांनी गेल्याच आठवड्यात पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सातव्याच दिवशी सोमवारी (ता.२८) या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील या बाजार समितीशी संबंधित या दोन्ही घटना निव्वळ योगायोगाच्या समजल्या जात असल्या, तरी या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग असल्याचे गुपित आता गुपित राहिलेले नाही.

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह संचालक, सचिव आदी ३७ जणांवर सुमारे ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांनी गेल्याच आठवड्यात पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सातव्याच दिवशी सोमवारी (ता.२८) या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील या बाजार समितीशी संबंधित या दोन्ही घटना निव्वळ योगायोगाच्या समजल्या जात असल्या, तरी या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग असल्याचे गुपित आता गुपित राहिलेले नाही. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवरती असलेली सोलापूर बाजार समिती राज्यातील पहिल्या पाच बाजार समित्यांमध्ये गणली जाते. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र या बाजार समितीमध्ये येते. राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातील ही बाजार समिती असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने यांच्यामध्ये सातत्याने बाजार समितीच्या मुद्द्यावरून राजकरण रंगत आल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यात राज्याच्या "सहकार व पणन'' विभागाची सत्ता देशमुख यांच्या हातात आल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे.

तत्कालीन संचालकांची चौकशी, मतदार याद्यावरील गोंधळ आणि शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार या निर्णयासाठी गेल्या दीड वर्षात बाजार समितीच्या प्रशासकाला दोन वेळेस मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली. आता तर आठ दिवसांपूर्वी सभापतींसह संचालकांवर दाखल झालेले गुन्हे आणि आता जाहीर झालेली निवडणूक, यामुळे शहकाटशहाचे राजकारण चांगलेच रंगल्याचे दिसते. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनही मंत्री देशमुख या निवडणुकीकडे पाहत आहेत. यामध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पण या सगळ्यामागील राजकारणाचं उघड गुपित आता गुपित राहिलेलं नाही. 

जुलैला मतदान, ३ जुलैला निकाल
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २ जून ही उमेदवारी अर्ज दाखलाची शेवटची तारीख आहे. १ जुलैला मतदान आणि ३ जुलैला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच थेट शेतकऱ्यांना या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार मिळणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी या निवडणूक कार्यक्रमाला सोमवारी (ता.२८) मंजुरी दिली. त्यानुसार २९ मे ते २ जून या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ४ जूनला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १९ जूनला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. २० जूनला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १ जुलैला मतदान आणि ३ जुलैला मतमोजणी होईल. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सुमारे १ लाख १८ हजार ८९९ शेतकरी मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतील.

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पीकेव्ही २ बीटी वाणामुळे कापूस...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे...
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मिळणार...चिपळूण, जि. रत्नागिरी ः अलिबागच्या पांढऱ्या...
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...