agrowon news in marathi, farmer in high court for FRP, Maharashtra | Agrowon

‘एफआरपी’साठी शेतकरी मुंबई उच्च न्यायालयात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

सोलापूर ः राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊसबिल दिले नसल्याने आणि सरकारही या प्रकरणात हातावर हात देऊन बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, याकडे लक्ष वेधताना न्यायासाठी सांगोल्यातील शेतकरी गोरख घाडगे व मंगळवेढ्यातील  शेतकरी सुनील बिराजदार यांनी थेट जनहित याचिका दाखल करून उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

सोलापूर ः राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊसबिल दिले नसल्याने आणि सरकारही या प्रकरणात हातावर हात देऊन बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, याकडे लक्ष वेधताना न्यायासाठी सांगोल्यातील शेतकरी गोरख घाडगे व मंगळवेढ्यातील  शेतकरी सुनील बिराजदार यांनी थेट जनहित याचिका दाखल करून उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

यंदाच्या हंगामात १८७ पैकी केवळ ६१ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार ऊस बिले दिली आहेत. उर्वरित कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना ठेंगाच दाखवला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गोरख घाडगे व सुनील बिराजदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सिद्धापूर येथील शेतकरी सुनील बिराजदार यांच्यासह ११ शेतकऱ्यांनी आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याला २२०० टन ऊस दिला होता.

परंतु त्या कारखान्याने एफआरपीनुसार प्रतिटन २३०० रुपये ऊसबिल दिले नाही. तसेच उसाचा हिशेबही दिला नाही. कारखान्याच्या व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिले. तरीही एफआरपीनुसार ऊस बिल दिले नाही. बिराजदार यांनी पुण्याच्या साखर आयुक्तांकडे तक्रार केली. त्यावर दोनवेळा आयुक्तांसमोर सुनावणी झाली. तेथे लेखी आश्वासन दिले. एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांना नोटीस काढण्यात आली.

तीन कारखान्यांवर जिल्हाधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमले. तरीही हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. नियम पायदळी तुडवणाऱ्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावीच, पण कायद्यानुसार ऊसबिले देऊ न शकलेल्या कारखान्यांकडून १५ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांची बिले द्यावीत, अशी ही मागणी याचिकेत केली आहे.

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...