हंगाम दारात; पैसा नाही हातात !

अामचे गाव पूर्वी बँक अाॅफ महाराष्ट्रच्या शाखेशी जोडलेले होते. अाता कर्जमाफी मिळाल्याने खाते निल होईल. त्यामुळे अाम्ही नवीन पीककर्ज मागण्यासाठी गेलो असता या बँकेचे अधिकारी अाता तुमचे गाव दुसऱ्या बँकेशी जोडल्याचे सांगत अाहे. नवीन कर्ज प्रकरण मंजूर करायला तयार नाही. एेन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी अाता कुणाकडे पैसे मागावेत. - प्रभाकर ठाकरे, शेतकरी, बोडखा, जि. बुलडाणा
मशागत
मशागत

अकोला ः राज्यात सर्वत्र १० जूनपर्यंत जोरदार पावसाचे संकेत अाहेत. यामुळे लवकरच पेरण्या सुरू होतील, अशी शक्यता गृहीत धरली जात अाहे. एकीकडे शेतकऱ्यांची यासाठी लगबग सुरू असताना त्यांच्या हातात बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत. कर्जमाफी झालेल्यांनाही नवीन पीककर्ज मिळाले नाही. प्रत्येक जिल्ह्यात सध्या निर्धारीत उद्दिष्टाच्या १० ते १५ टक्केसुद्धा पीककर्जवाटप झाले नसल्याची वस्तुस्थिती समोर येत अाहे. पावसाच्या अागमनामुळे या हंगामाची सुरवात चांगली झाली अाहे. येत्या १० जूनपर्यंत मॉन्सून सगळीकडे सक्रिय होण्याचा अंदाज असल्याने शेतकरी एकीकडे शेतीकमात व्यस्त असताना दुसरीकडे मात्र पेरणीला लागणारे बी-बियाणे, खते खरेदीसाठी त्याच्या हातात दमडीही नाही. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्यांच्या खात्यात शासनाच्या रकमा जमा नसल्याने बँका नवीन पीककर्ज देताना हात अाखडत अाहेत. काहींच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असली तरी कागदपत्रांच्या अडचणी, बँकामध्ये सर्व्हर डाऊन होणे, कर्मचाऱ्यांचा तुटवडा ही कारणे भोवत अाहेत. असंख्य बँक शाखांमध्ये दिवसाला केवळ १५ ते २० प्रकरणे हातावेगळी केली जात आहेत, इतकी ही गती संथ अाहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाखांमध्ये सध्या सर्वत्र गर्दी बघायला मिळते अाहे. प्रत्येकजण कर्जमाफी झाली का, नवीन पीककर्ज कधी मिळेल, याचीच विचारणा करताना दिसतो.  असंख्य शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी ही अजूनही त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. ज्यांची झाली त्यांच्या याद्यांबाबत गोंधळ अाहे. ज्या शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीत अालेली अाहेत अशा शेतकऱ्यांचे पैसे बँकांना मिळालेले नाहीत. शासनाने केवळ पत्र देऊन कर्जमाफी झालेल्यांना कर्ज द्या असे म्हटले. परंतु हा एवढ्यावरच विषय संपत नाही. बँका केवळ पत्राला जुमानत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले अाहे. बँकांची चलाखी कर्जमाफीनंतर काही राष्ट्रीयकृत बँकांनी मोठी चलाखी केली अाहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले अाणि अाता ज्यांना माफी मिळाली, अशांची खाती नील होऊनही या हंगामासाठी नवीन कर्ज देण्यास नकार दिला अाहे. आता तुमचे गाव अामच्या शाखेशी पीककर्जासाठी जोडलेली नाही, तुम्ही दुसऱ्या बँकेकडे अर्ज करा, असे सांगितले जात अाहे. दुसरीकडे सुचविलेली बँक शाखाही अाम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही, असे सांगून मोकळी होत अाहे. काही ठिकाणी दुसऱ्या बँकेने कर्ज दिले तरी हा शेतकरी नवीन खातेदार होत असल्याने त्याची पत सुद्धा नव्याने तयार होत अाहे.   एक कागद...बारा भानगडी राज्यात अाॅनलाइन सातबारा मिळणार असल्याची घोषणा झाली खरी, मात्र प्रत्यक्षात हा सातबारा सहजपणे शेतकऱ्यांच्या हातात सध्या पडत नाही. बऱ्याच ठिकाणी ई-सेवा केंद्रावरून तर जवळपास महिभाभरापेक्षा अधिक काळापासून सातबारा, नमुना अाठ अ मिळणे बंद झाले अाहे. सध्या शेतकऱ्याला नवीन पीककर्ज मिळवण्यासाठी नो ड्युजचे दाखले, सातबारा, नमुना अाठ असे विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत अाहे. अाॅनलाइन सातबारा काढण्यासाठी अाता पुन्हा तलाठ्यासोबतच संपर्क साधावा लागतो. ग्रामीण भागात लिंक मिळत नाही. मध्यंतरी या सॉफ्टवेअरमध्ये अडचणी असल्याने अाठवडाभर सिस्टीमच बंद होती. अाता ही यंत्रणा कार्यान्वित झाली असली तरी शेतकऱ्यांना सातबारा हा तलाठ्याच्या लॉगिनमधून घ्यावा लागत अाहे. यासाठी प्रिटिंग खर्च म्हणून २० ते ३० रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात अाहे.  १० टक्केही हंगाम नाही जूनचा पहिला अाठवडा संपत अाला. पावसाचेही अागमन झाले. मात्र अद्यापही बी-बियाणे, खतांच्या बाजारात तेजी नाही. कालपासून शेतकरी विचारणा करू लागला. काहींनी पैशांची जुळवाजुळव करून खरेदी केली. दरवर्षीच्या तुलनेत अातापर्यंत ५ ते १० टक्केसुद्धा विक्री झालेली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सर्वच शेतकरी अडचणीत असल्याचे या व्यवहारांमधून दिसत असल्याचे विक्रेत्यांचे मत होते.  प्रतिक्रिया सध्याचे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत असंवेदनशील अाहे. मी कालच संग्रामपूर येथील स्टेट बँकेत शाखाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या शाखेत २१०० खातेदार शेतकरी अाहेत. त्यापैकी एकालाही अद्याप पीककर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे दोन हजार शेतकऱ्यांना किती दिवसात ते कर्ज देतील हे सांगता येत नाही. शिवाय या बँकेच्या २१०० खातेदारांपैकी १३०० शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीत अालेली अाहेत. त्यांनाच कर्ज दिले जाईल. उर्वरीत ८०० शेतकऱ्यांनी काय करायचे. अशा सावळ्या गोंधळामुळे पैसे नसल्याने शेतकरी पेरणी करू शकणार नाहीत. पुन्हा एकदा शेतकरी अात्महत्या वाढलेल्या दिसतील. हा शेतकऱ्यांप्रती असलेल्या असंवेदशिलतेचा परिणाम असेल.  - अामदार राहुल बोंद्रे, चिखली जि. बुलडाणा

कर्जमाफी जाहीर झाली, मात्र अद्याप खाते निल झाले किंवा नाही हे समजले नाही. नवीन पीककर्ज कधी मिळेल, पेरणी कधी करावी असा प्रश्न उभा राहिला अाहे. - श्रीकृष्ण जुनारे, नांदुरा, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com