शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांची गय नाही ः मास्तोळी

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांची गय नाही ः मास्तोळी
शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांची गय नाही ः मास्तोळी

कोल्हापूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक अथवा फसवणूक होणार नाही, यासाठी कृषी विभाग दक्ष असून जिल्हास्तरावर २ आणि तालुकास्तरीय प्रत्येकी १ अशी १४ भरारी पथके कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली. यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने अन्नधान्य पिकामध्ये १ लाख ४८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील पिकापासून ४ लाख ५० हजार ६०० मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये तृणधान्य पिकाचे ४ लाख ५० हजार ६०० मे.टन उत्पादन तसेच कडधान्य पिकाचे ४ हजार मे.टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. गळीतधान्य पिकाचे २ लाख ४३ हजार १०० मे.टन तर ऊस पिकाचे १४२ मे. टन प्रतिहेक्टरचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे आणि रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. 

२०१८-१९ मध्ये पेरणीसाठी सोयाबीन १४ हजार क्वि., भात १८ हजार २७१ क्वि., ज्वारी ४१३ क्वि., भुईमूग २ हजार ४०० क्वि., बियाणांची गरज असून खरीप हंगाम नियोजनानुसार ३५ हजार ३२१ क्वि. बियाण्यांची गरज लक्षात घेऊन महाबीजकडून २३ हजार क्वि., तर उर्वरित बियाणे इतर खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यासाठी बियाणे, खते आणि कीडनाशकांचे ३६९ नमुने काढण्याचे उद्दिष्ट होते, मात्र प्रत्यक्षात कृषी विभागाने बियाणे, खते आणि कीडनाशकांचे ३३७ नमुणे काढले असून खरीप हंगामात गुणनियंत्रण

निरीक्षकामार्फत बियाणे, खते आणि किडनाशकांच्या ३५७ परवाण्यांची तपासणी करुन नमुणे काढण्यात आले आहेत. आत्तापर्यंत बियाणांचे २ तर खतांचे ५ असे ७ परवानाधारकांना विक्रीबाबतचे आदेश दिल्याचेही श्री. मास्तोळी यांनी सांगितले. खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक अथवा फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा श्री. मास्तोळी यांनी दिला.

खते, बियाण्याच्या उपलब्धतेला प्राधान्य खरीप हंगाम सन २०१८-१९ साठी १ लाख ९१ हजार १५० मे.टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून, मंजूर १ लाख ४३ हजार ४१० मे.टन आहे. एप्रिल २०१८ अखेर कंपनी व डीलरकडील शिल्लक खतसाठा ४८ हजार २१३ मे.टन आहे व एप्रिलमध्ये उपलब्ध साठा २७ हजार ९७५ मे.टन झाले असून एकूण उपलब्ध साठा ७६ हजार १८८ मे.टन आहे. खरीप हंगामात बियाणे आणि खतांची पुरेशी उपलब्धता करुन देण्यास कृषी विभागाचे सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com