agrowon news in marathi, farmers son got success in JEE exam, Maharashtra | Agrowon

शेतकऱ्याच्या १५ वर्षीय मुलाचे ‘जेईई’त यश
वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नवी दिल्ली ः देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेत प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई’ परीक्षेत बिहारमधील एका खेड्या गावातील शेतकऱ्याच्या १५ वर्षीय शिवम कुमारने यश संपादित केले आहे. या वर्षी ‘जेईई’मध्ये पास होणारा शिवम हा सर्वांत लहान विद्यार्थी ठरला आहे. 

नवी दिल्ली ः देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेत प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई’ परीक्षेत बिहारमधील एका खेड्या गावातील शेतकऱ्याच्या १५ वर्षीय शिवम कुमारने यश संपादित केले आहे. या वर्षी ‘जेईई’मध्ये पास होणारा शिवम हा सर्वांत लहान विद्यार्थी ठरला आहे. 

शिवमचा जन्म २८ आॅक्टोबरला बाखोरपूर या गावात झाला. नुकत्याच लागलेल्या ‘जेईई’ परिक्षेत ३६० पैकी २४१ गुण मिळवत शिवमने देशात ३८३ वे स्थान पटकावले आहे. शिवमचा मोठा भाऊ सत्यमही २०१२ मध्ये १३ व्या वर्षी ‘जेईई’ परीक्षा उत्तीर्ण झाला होता. ‘‘नियमित अभ्यास, नोट्स, सराव आणि प्रश्न सोडविल्यामुळे मला यश मिळाले’’, असे शिवमने म्हटले आहे. तसेच शिवमने १२ वीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण संपादित केले आहे. शिवाय त्याने नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशनमध्येही (एनटीएसई) यश मिळविले आहे. ‘एनटीएसई’ ही देशपातळीवरील महत्त्वाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे. 

गावात चांगल्या शिक्षणाची सोय नसल्याने वडिलांनी शिवमला भाऊ सत्यमसोबत कोटा येथे शिक्षणासाठी पाचव्या वर्षी पाठविले. त्याने शाळेतील प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळविल्याने त्याला थेट तिसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात आला. ‘‘माझ्या दोन्ही मुलांनी महत्त्वाच्या जेईई परीक्षेत यश संपादन केल्याने मला त्याचा आनंद आहे,’’ अशी प्रतिक्रिया शिवमचे वडील सिद्धनाथ सिंग यांनी व्यक्त केली.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...