agrowon news in marathi, favorable condition for monsoon progress, Maharashtra | Agrowon

माॅन्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

पुणे : माॅन्सूनला राज्यातून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार होत आहे. दोन ते तीन दिवसांत माॅन्सून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.  

पुणे : माॅन्सूनला राज्यातून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार होत आहे. दोन ते तीन दिवसांत माॅन्सून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.  

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पोषक वातावरण नसल्यामुळे ९ जूननंतर तर मराठवाडा व विदर्भात ११ जूननंतर माॅन्सून पुढे सरकलेला नव्हता. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून माॅन्सूनसाठी पोषक हवामान तयार होत आहे. माॅन्सून पुन्हा सक्रिय होण्यास सुरवात झाली आहे. दोन-तीन दिवसांत तो मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपूर्वी माॅन्सून ठाणे, नगर, बुलढाणा, अमरावती, गोंदिया या भागात दाखल होता, तीच स्थिती अजूनही कायम आहे.

सध्या महाराष्ट्र ते केरळ या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून कोकणाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेश, हरियानाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर असून माॅन्सूनला पुढे सरकण्यासाठी ही स्थिती अनुकूल आहे. तसेच उत्तर प्रदेश ते हिमालय, पश्चिम बंगाल या भागातही कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूंपातर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माॅन्सून पुढे सरकण्याची शक्यता असून छत्तीसगड, उडिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, बिहार, मध्य प्रदेशच्या काही भागात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक...
बळी ः अफवांचे अन्‌ अनास्थेचेहीधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात राईनपाडा...
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटपऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
बोंड अळी, तुडतुड्यामुळे नुकसानग्रस्त...नागपूर : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे...
दुध आंदोलनाची धग कायमपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ...
दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची...नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा...
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा...नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार...
पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे...पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू...
नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे...