agrowon news in marathi, fish farming in one thousand farm ponds, Maharashtra | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात एक हजार शेततळ्यात मत्सशेती
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 जुलै 2018

यवतमाळ : शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मीती झाली आहे. या शेततळ्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी एका हजार शेततळ्यात मत्सशेतीचा अभिनव प्रयोग केला जाणार असून मत्सशेतीसाठी आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली.

यवतमाळ : शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मीती झाली आहे. या शेततळ्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी एका हजार शेततळ्यात मत्सशेतीचा अभिनव प्रयोग केला जाणार असून मत्सशेतीसाठी आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली.

सततचा दुष्काळ, होणारी नापिकी त्यामुळे वाढलेले कर्ज अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी नाइलाजाने आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे. शेतकरी अशा जाचातून मुक्त व्हावा, असा टोकाचा निर्णय त्याने घेऊ नये, यासाठी शेतीसोबत जोडधंदा, आधुनिक शेतीतून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचेकडून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आधी शेततळे तयार करण्याचे काम हाती घेतले. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक शेततळे करणाऱ्या यादीत जिल्हा राज्यात अव्वल क्रंमाकात आहे. तयार करण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. 

केम व टाटाट्रस्ट यांच्या माध्यमातून शेततळे तयार केलेल्या जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांची निवड करून या शेततळ्यात ‘मत्सशेती''चा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन मत्सबीज ‘सीडलिंग''उपलब्ध करून देणार आहे. मत्सबीज कलकत्ता येथून उपलब्ध करून द्यायचे की कोणता पर्याय घ्यायचा या तांत्रिक बाबीवर विचार सुरू असला तरी येत्या काही दिवसांत मत्सशेतीचा प्रयोग जिल्ह्यात सुरू होणार आहे.

रेशीम शेतीनंतर दुसरा प्रयोग
जिल्ह्यात यंदा रेशीम शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पाडणारी रेशीमशेती आहे. त्यानंतर आता मत्सशेतीचा प्रयोग शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
पावसाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. अधिवेशनादरम्यान १० जुलैला जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. या बैठकीत शेततळ्यात मत्सशेतीबाबत प्रेझेंटेकशन केले जाणार आहे. शिवाय, काही अडचणीबाबत चर्चा होणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...