भारतातून पाच लाख गाठी कापूस आयातीचा चीनचा करार

कापूस गाठी
कापूस गाठी

मुंबई ः चीनमध्ये कापूस लागवड नियोजन चुकल्याने २०१७-१८ च्या हंगामात कमी उत्पादन झाले होते. त्यामुळे चीनला संरक्षित साठ्याचा आणि वापर आयात करून देशांतर्गत उद्योगाची गरज भागवावी लागली. त्यामुळे यंदाच्या हंगामातही चीनला कापूस तुटवडा भासणार असून, येथील व्यापाऱ्यांना भारतातून कापूस खरेदीचे करार करण्यास सुरवात केली आहे. चीनमधील व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ५ लाख गाठी (एक गाठ = १७० किलो) कापूस आयातीचे करार भारतीय निर्यातदारांशी केले आहे.  कापूस उत्पादनात घट झाल्यानंतर चीनमधील आयातदारांचा भर हा भारतातून कापूस आयातीवरच राहिला आहे. नुकतेच चीनमधील आयातदारांनी भारतातून यंदाच्या, २०१८-१९ च्या हंगामात कापूस आयातीचे करार केले आहे. त्यामुळे नव्या हंगामातही भारतातून चीनची आयात सुरूच राहणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई येथील डी. डी. कॉटनचे व्यवस्थापकीय संचालक अरुण सेखसारिया म्हणाले, की चीनमधील व्यापाऱ्यांनी नुकतेच भारतातून नोव्हेंबर-डिसेंबरच्या शिपमेंटवर ५ लाख गाठी कापूस खरेदीचे करार केले आहे. हे करार ८८ ते ९२ सेंट प्रतिपौंडने झाले आहेत. चीनचा संरक्षित साठा २०१५ पासून कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. चीन आता हा संरक्षित साठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता आहे.  कापूस साठ्याची आणि उत्पादनाची स्थिती पाहता चीन आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या कापूस हंगामात भारतातून किमान २० लाख गाठी आयात करण्याची शक्यता आहे. चीनमध्ये साठ्यातील घट आणि येणाऱ्या कापूस हंगामात हवामानाचा फटाक कापूस पिकाला बसून उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी होण्याच्या भीतीने चीनमध्ये पुरवठ्यात घट झाली आणि एप्रिलपासून कापसाच्या दरात १८ टक्के वाढ झाली आहे.    चीन कॉटन असोसिएशनने मात्र कापसाचा तुटवडा नसून दर आवक्यात राहतील असे म्हटले आहे. मात्र, चीन नॅशनल कॉटन रिझर्व्हस् कॉर्प्स ने ज्या कंपन्या कापड उद्योगाशी निगडित नाहीत त्यांना दैनंदिन कापूस लिलावात सहभागी होण्यास निर्बंध घातले आहेत. त्यावरून चीन येत्या वर्षात विदेशातून आयात वाढण्याची शक्यता आहे. सध्या जगात फक्त भारतात पर्याप्त कापूस उपलब्ध आहे. ‘‘आतापर्यंत भारातातून ६५ लाख गाठी निर्यात झाली आहे. सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या कापूस हंगामापर्यंत ही निर्यात ७५ लाख गाठींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मला विश्वास आहे की भारत यंदा ७५ ते ७८ लाख गाठी कापूस निर्यात करेल. बांगलादेश हा सर्वांत मोठा कापूस आयातदार देश आहे, त्यानंतर व्हिएतनाम, चीन, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचा नंबर लागतो,’’ असेही अरुण सेखसारिया म्हणाले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com