agrowon news in marathi, gajanan maharaj dindi leave for pandharpur, Maharashtra | Agrowon

'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे पायदळ दिंडीसह मंगळवारी (ता. १९) सकाळी शेगाव येथून विठ्ठलनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. गेली ५० वर्षे ही पालखी आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होत आली आहे.

शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे पायदळ दिंडीसह मंगळवारी (ता. १९) सकाळी शेगाव येथून विठ्ठलनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. गेली ५० वर्षे ही पालखी आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होत आली आहे.

श्री संत गजानन महाराजांचा जयजयकार करीत टाळ मृदंगाच्या गजरात, अश्व, गज, रथ, मेना, भालदार, चोपदार, अशा राजवैभवी थाटात या पायदळ वारीत टाळकरी, पताकाधारी वारकरी सहभागी झाले आहेत. पालखी श्रींच्या प्रकटस्थळी आल्यानंतर तेथे आरती करण्यात आली. टाळ मृदंगाचा निनाद, पावल्या खेळताना टाळकऱ्यांच्या ‘गण गण गणात बोते'च्या गजराने शहरात मंगलमय वातावरण पसरले होते.

सकाळी मंदिरात सुशोभित राजसिंहासनावर श्रींचा रजत मुखवटा ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात विराजमान झाल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त निळकंठदादा पाटील यांनी पजूा केली. तसेच या वेळी संस्थांनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

स्वागत सोहळा श्रींचे प्रगटस्थळ येथे झाला. श्रींच्या पालखी समवेत वारकऱ्यांना फराळ व नागझरी रोडलगत अशोकराव देशमुख यांच्या वतीने चहापान देण्यात आले. संत नगरीतून निघालेल्या पालखीचे पहिले स्वागत श्री क्षेत्र नागझरी येथे श्री गोमाजी महाराज संस्थानच्या वतीने झाले. या वेळी संस्थानतर्फे वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक...
बळी ः अफवांचे अन्‌ अनास्थेचेहीधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात राईनपाडा...
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटपऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
बोंड अळी, तुडतुड्यामुळे नुकसानग्रस्त...नागपूर : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे...
दुध आंदोलनाची धग कायमपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ...
दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची...नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा...
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा...नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार...
पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे...पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू...
नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे...