agrowon news in marathi, gave yearly insurance for grapes, Maharashtra | Agrowon

द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू करण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 मे 2018

द्राक्ष पीकविमा हा केवळ ऑक्‍टोबर ते मार्च असा नको आहे. शासनाने द्राक्ष पिकासाठी वर्षभरासाठी विमा योजना लागू केला तरच शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे मिळतील.
- चंद्रशेखर नरवाडकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मिरज, जि. सांगली

सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर जिल्ह्यात गारपिटीने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षासाठी शासनाची फळपीक विमा योजना ऑक्‍टोबर ते मार्चपर्यंत आहे. त्यानंतरच्या कालावधीसाठी हा विमा लागू होत नाही. परिमाणी गारपिटीने बाधित झालेल्या द्राक्षबागेला कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही. त्यामुळे विमा वर्षभरासाठी सुरू करावा, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून होते आहे. 

शासनाने द्राक्ष पिकाला विमा संरक्षण दिले आहे. या माध्यमातून ऑक्‍टोबर ते ३० मार्चपर्यंत हा विमा लागू होतो. दरमान्य बाधित झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा कितपत फायदा होतो याबाबत प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. वास्तविक पाहता द्राक्षाची एप्रिल छाटणी (खरड छाटणी) केली जाते. या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यास हा विमा बाधित झालेल्या द्राक्षबागेला लागू होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. 

जिल्ह्यात यंदा एप्रिल छाटणी म्हणजे खरड छाटणी पूर्ण झाली. चांगले फुटवे आले. मात्र, गेल्या पंधरा दिवसापूर्वी तासगाव आणि पलूस तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे सुमारे २ हजार एकर क्षेत्र बाधित झाले. हे फुटवे पूर्ण वाया गेले. या फुटव्यांची ऑक्‍टोबरमध्ये फळ छाटणी होते. त्यानंतर फळधारणा, मात्र आता फुटवेच मोडून पडले तर फळधारणा होणार कशी ? नवे फुटवे घ्यावेत, तर वेळ पुढे जाते. त्यामुळे प्रचंड मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. 
मात्र, शासनाच्या नियमाप्रमाणे या काळात संरक्षण मिळाले नाही. यामुळे केवळ तासगाव तालुक्‍यात सुमारे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष पिकाला वर्षभर विमाच्या सरंक्षण मिळावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

गेल्या महिन्यापूर्वी तासगाव तालुक्‍यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवकाळीने नुकसान झालेल्या द्राक्षबागेची पाहणी केली होती. या वेळी त्यांनी ‘‘वर्षभरासाठी विम्याचे संरक्षण देण्याबाबत कृषिमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू’’, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या दिसत नाहीत.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...