agrowon news in marathi, Gi Rating for sangali turmeric, Maharashtra | Agrowon

सांगलीच्या हळदीला ‘जीआय’ मानांकन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

सांगली ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगलीची हळद प्रसिद्ध आहे. केंद्रीय पेटंट कार्यालयाकडून मंगळवारी (ता. २६) ‘सांगलीची हळद’ म्हणून पेटंट मिळाले. सांगलीच्या हळदीला स्वतःची ओळख निर्माण करून देणारे जीआय मानांकन मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हळदीची निर्यात होण्यास संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती गणेश हिंगमिरे यांनी दिली.

सांगली ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगलीची हळद प्रसिद्ध आहे. केंद्रीय पेटंट कार्यालयाकडून मंगळवारी (ता. २६) ‘सांगलीची हळद’ म्हणून पेटंट मिळाले. सांगलीच्या हळदीला स्वतःची ओळख निर्माण करून देणारे जीआय मानांकन मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हळदीची निर्यात होण्यास संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती गणेश हिंगमिरे यांनी दिली.

जिल्ह्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते. त्याचप्रमाणे हळद ठेवण्यासाठी हरिपूर येथे पेवांचा वापर केला जातो. त्यामुळे हळदची प्रतवारी चांगली राहण्यास मदत होते. इथल्या हळदीची प्रतवारी, रंग आणि टिकाऊपणा यामुळे प्रा. गणेश हिंगमिरे यांनी सन २०१३ मध्ये प्रथम मुंबई कार्यालयाकडे पेटंटसाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यानच्या काळात सांगली परिसरातील हळद उत्पादकाबरोबर राहून प्रा. हिंगमिरे त्यांनी पाठपुरावा केला. सांगली परिसरातील हळदीची केसरी रंग, पेवातील साठवणूक आणि अन्य माहिती त्या प्रस्तावात होती. या प्रस्तावावर मंगळवारी (ता. २६) सुनावणी झाली. अखेर पेटंट मिळाले.

‘सांगलीची हळद’ या नावाखाली अन्य कोणत्याही हळदेची विक्री करता येणार नाही. यापूर्वी सांगलीच्या हळदीला भौतिक संपदेचे पेटंट मात्र नव्हते. पुण्याचे प्रा. हिंगमिरे यांनी पाच वर्षांपासून प्रयत्न सुरू केला होता. अखेर केंद्रीय पेटंट कार्यालयाकडून मंगळवारी ‘सांगलीची हळद’ म्हणून पेटंट मिळाले. यामुळे सांगलीचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर झळकणार आहे.
हळदीला जीआय मानांकन नसल्याने सांगलीच्या हळदीचा ब्रॅंड नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. हळदीचा ब्रॅंड होणे फार महत्त्वाचे होते. आता हळदीला जीआय मानांकन मिळाले आहे. आपल्याला ब्रॅंडिंगद्वारे हळदीला आंतरराष्ट्रीय बाजार पेठ काबिज करणे शक्‍य होणार आहे. आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.

पेटंटचे फायदे....

  •    सांगली हळदीला जीआय मानांकनाचा कोड मिळणार
  •    सांगलीच्या हळदेला आंतरराष्ट्रीय मानांकन
  •    शेतीमालाला प्रतिष्ठा व नेमकी ओळख
  •    मानांकनामुळे गुणवत्तेची खात्री

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...