agrowon news in marathi, H. D. Kumarswamy Karnatka Chief Minister, Maharashtra | Agrowon

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी विराजमान
वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी (ता. २३) येथे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. बुधवारी दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी (ता. २३) येथे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. बुधवारी दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

कर्नाटकच्या विधान भवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडला. आज, २४ मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होईल त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 
एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकमधील एकूण ३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसला, तर मुख्यमंत्री पदासह १२ खाती जेडीएसला देण्यात येणार आहेत. तसेच २४ मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून, त्यानंतर मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल, असे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले होते.

या सोहळ्यादरम्यान, राजकीय व्यसपीठांवर कट्टर विरोधक असणाऱ्या मायावती आणि सोनिया गांधी यांनी एकमेकांची गळाभेट घेत संवाद साधला. तसेच राहुल गांधी, अखिलेश यादव आणि सीताराम येचुरी यांनी एकमेकांना माध्यमांसमोर एकत्र छायाचित्रे काढून घेण्यासाठी बोलावून घेतले. बिहारमध्ये भाजपामुळे सत्ता गमावलेले लालू पुत्र तेजस्वी यादव तसेच त्यांचे समर्थक शरद यादव यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

सर्व विरोधक एकत्र 
या शपथविधी सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, शरद यादव यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. केंद्रात विरोधी पक्षात असलेले हे सर्व नेते यानिमित्त एकत्र आले होते. त्यामुळे आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे सर्व दिग्गज नेते एकत्र असतील, असे भाकीत राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

सरकार तीन महिने चालेल ः येडियुरप्पा
काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार स्थापन झाले असले, तरी भाजपचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या मते हे सरकार तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या सरकारच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त केली. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपले कर्नाटकमध्ये अँटी पीपल मँडेट डे म्हणजे जनादेश विरोधी दिवस साजरा केला. याचदरम्यान येडियुरप्पा म्हणाले, की भूक, लालसा आणि सत्ता हेच काँग्रेस-जेडीएस आघाडीचा आधार आहे. अशापद्धतीने सत्तेवर आलेले सरकार तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस टिकणारही नाही.

इतर अॅग्रो विशेष
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
शेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...
‘एमएसीपी’चे फलित काय ?पुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...
एकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...
स्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...
केरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...
वानरांचा बंदोबस्त करणार कसा? माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...
योजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...
क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...
‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...
मॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...
मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...
वर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...