agrowon news in marathi, heavy rain in Kokan and valley, Maharashtra | Agrowon

कोकण, घाटमाथ्यावर दमदार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

पुणे : राज्यात मॉन्सूनचे पुनरागमन झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात दणक्यात पाऊस पडला. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यातील रतनवाडी येथे उच्चांकी ३५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पालघर, रायगड, ठाण्यातही मुसळधार पाऊस कोसळला. सह्याद्रीचा घाटमाथा आणि पूर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला, तर जळगावतील हतनूर धरणाचे दरवाजे उघडले आहेत.

पुणे : राज्यात मॉन्सूनचे पुनरागमन झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात दणक्यात पाऊस पडला. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यातील रतनवाडी येथे उच्चांकी ३५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पालघर, रायगड, ठाण्यातही मुसळधार पाऊस कोसळला. सह्याद्रीचा घाटमाथा आणि पूर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला, तर जळगावतील हतनूर धरणाचे दरवाजे उघडले आहेत.

रविवारी आणि सोमवारी कोकणातील पालघर, रायगड, ठाणे जिल्‍ह्यांत मुसळधार, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला. पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वत्र पाणी भरून जमीन खचल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर घाटमाथ्यासह कोल्हापूर, पुणे, नाशिक, नगर, सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने दमदार बरसात केली. 

डोंगरांवरील धबधबे, झरे वाहू लागल्याने नद्या, नाल्यांना पूर येऊन धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली, तर नगर मधील घाटघर धरण भरले आहे. मुळा नदी दुथडी भरून वाहिल्याने कोतूळ येथील पूल पाण्याखाली गेला होता. तर मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मंगळवारी (ता. २६) सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी येत असल्या तरी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. 

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - हवामान विभाग) : 
कोकण : विक्रमगड १९०, जव्हार, लांजा, पालघर, तलासरी प्रत्येकी १७०, माथेरान १६०, डहाणू, उल्हासनगर, वाडा प्रत्येकी १५०, कर्जत, महाड, मोखडा, संगमेश्‍वर, शहापूर प्रत्येकी १४०, अंबरनाथ, ठाणे प्रत्येकी १३०, भिरा, कल्याण, माणगाव, पोलादपूर प्रत्येकी १२०, पनवेल, वैभववाडी प्रत्येकी ११०, म्हसळा १००, बेलापूर, भिवंडी, वसई प्रत्येकी ९०, खालापूर, मंडणगड, सोहा प्रत्येकी ८०, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी प्रत्येकी ७०, उरण ६०, कणकवली, खेड, मडगाव, सांताक्रुज, मुरूड, पेन, सांगे प्रत्येकी ५०.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर १७०, ओझरखेडा, राधानगरी प्रत्येकी १४०, पेठ १३०, इगतपुरी १२०, हर्सुल, त्र्यंबकेश्‍वर प्रत्येकी ११०, गगनबावडा १००, अकोले, लाेणावळा प्रत्येकी ९०, चंदगड ८०, कळवण ७०, साक्री, शाहूवाडी, वेल्हे प्रत्येकी ६०, आंबेगाव, गारगोटी, ओझर, पाटण, पौड, मुळशी, शिराळा प्रत्येकी ५०. अजरा, जामनेर, कागल, कोल्हापूर, मालेगाव, नवापूर ४०.  

घाटमाथा : ताम्हिणी १५०, दावडी १४०, डुंगरवाडी, भिवपुरी प्रत्येकी १३०, शिरगाव १२०, कोयना पोफळी ११०, आंबोणे १००, खोपोली, खंद, धारावी प्रत्येकी ९०, वाणगाव, वळवण, शिरोटा प्रत्येकी ८०, कोयना नवजा, ठाकूरवाडी प्रत्येकी ६०.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : भातसा १५०, अप्पर वैतरणा १३०, मध्य वैतरणा, तानसा प्रत्यकी १२०, तुलसी १००, विहार ९०. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार?
कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात अाज (ता. २७) तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारपर्यंत (ता. ३०) कोकणात जोरदार पावसाचा अंदाज असून, शनिवारी मध्य महाराष्ट्रात जोर वाढण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पावसाने जोर धरलेला नसून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. 

बिहार, झारखंडमध्ये मॉन्सूनची वाटचाल
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पूर्व भारतील वाटचाल सुरू ठेवत मंगळवारी (ता. २६) संपूर्ण पश्‍चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंडचा बहुतांशी भाग व्यापला आहे. पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने शुक्रवारपर्यंत (ता. २९) मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, बिहार राज्य व्यापणार असून, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. ३०) राजस्थान, दिल्लीसह वायव्य भारतातील बहुतांशी भागात मॉन्सून पोचणे शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

  •  पालघर, रायगड,  ठाण्यात मुसळधार
  •  घाटमाथा, सह्याद्रीच्या पूर्व भागात जोर
  •  नद्यांना पूर, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
  •  कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली
  •  हतूनर धरणाचे दरवाजे उघडले

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...