मराठवाड्यात दमदार पाऊस

माॅन्सून दाखल झाल्यानंतर येथे शुक्रवारी (ता. ८) सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. तर तावरजा नदी खळखळून वाहत आहे.
माॅन्सून दाखल झाल्यानंतर येथे शुक्रवारी (ता. ८) सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. तर तावरजा नदी खळखळून वाहत आहे.

पुणे : मृग नक्षत्राला प्रारंभ होत असतानाचा मराठवाड्यात धुवाधार कोसळत माॅन्सूनने दमदार आगमन केले आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर उमरगा (जि. उस्मानाबाद) येथे १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. मराठवाड्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला; तर रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यालगत समुद्रात उधाण आले आहे.  मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्याला पावसाने धूमशान घालत अक्षरश: झोडपून काढले, लातूरच्या मदनसुरी येथील ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे निलंगा ते किल्लारीचा संपर्क तुटला आहे. औराद शहाजनी येथे तेरणा नदी भरून वाहू लागली. तर डोंगरगाव बॅरेजेच दरवाजे उघडून मांजरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. उमरगा (जि. उस्मानाबाद) शहर व तालुक्‍यात शुक्रवारी (ता. ८) मध्यरात्री व पहाटे झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण शहर जलमय झाले. शेत-शिवारातील बांध फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील जवळपास दोनशे घरात पाणी घुसल्याने संसारोपयी साहित्याचे मोठे नुकसान झाले. शेत शिवारातून आलेल्या पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर थांबल्याने मध्यरात्री दोन नंतर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. परभणी, हिंगोली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.   सोलापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून आधीच सुरू असलेला पाऊस आणि गुरुवारी मृग नक्षत्राच्या आगमनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू झालेला त्याचा जोर, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अक्कलकोटपासून ते शेवटच्या सांगोला, करमाळा, माळशिरसपर्यंत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी शेतशिवारात पाणी साचून राहिले. ओढे, नाले भरून वाहू लागले. तर सातारा आणि सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. कोकणातील रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी दमदार पाऊस पडला.  शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग) :  कोकण : रायगड - रामरज ६३,  लोनेरे ५३, रत्नागिरी - रत्नागिरी ५९, कोटवडे १२९, देवले ६३, लांजा ४८, सिंधुदुर्ग - म्हापण ५७, वेटोरे ६०, कडवल ५३.  मध्य महाराष्ट्र : सोलापूर - तिऱ्हे ८३, वडाळा ५४, वळसंग ४६, अक्कलकोट ४१, मैंदर्गी ४१, नरखेड ३२, सांगली - माडग्याळ ३१, कोल्हापूर - गडहिंग्लज ४८,  नारंगवाडी ५१, हेरे ४८. मराठवाडा : लातूर - बाभळगाव ५४, कासारखेडा ३५, औसा ५९, लामजना ११४, मातोळा ७६, भादा ३४, बेलकुंड ६८, किनी १०२, किल्लारी १०९, किनगाव ५०, आंधोरी ३४, शिरूर अनंतपाळ ५१, निलंगा १०७, पानचिंचोली ९९, निटूर ५६, औराद ५२, कासार बालकुंड ९३, आंबूलगा ६५, मदनसुरी ११८, उदगीर ६१, नागलगाव ६१, मोघा ५४, देवार्जन ४७, शेलगाव ४३, पानगाव ३८, देवणी ६४, वलांडी ६६, शिरूर अंतरमाळ ७०, साकोळ ४२, उस्मानाबाद - बेंबळी ४७, पडोली ५९, कासेगाव ६८, तुळजापूर ३८, सालगारा ५०, सावरगाव ७१, जळकोट ४७, उमरगा १५७, डाळिंब ९२, नारंगवाडी ८१, मुलाज ९६, मुरूम ८४, लोहारा ७३, माकणी ४६, जेवळी ७५, नांदेड - नांदेड शहर ३१, विष्णुपुरी ६४, लिंबगाव ३७, तरोडा ३४, बिलोली ७२, कुंडलवाडी ६०, अदमपूर ४१, लोहगाव ४५, कंधार ४५, कुरूळा ३८, फुलवळ ४१, लोहा ४१, सोनखेड ३३, कलंबर ५३,  देगलूर ३४, खानापूर ३३, मरखेल ४६, माळेगाव ४०, शहापूर ४०, हनेगाव ९८, मुदखेड ३३, धर्माबाद ५०, करखेली ५९, जळकोट ६०, गोळेगाव ३७, अर्धापूर ३८, मालेगाव ५३. परभणी - गंगाखेड ७८, महातपूरी ३७, माखणी ३३, पालम ३९, चाटोरी ३२, देऊळगाव ७९, हिंगोली - नांदापूर ४८, आखाडा ४३, वारंगा ३३, गिरगाव ३९, कुरुंदा ४१.  विदर्भ : वाशीम - वारळा ८७, पोटी ४९, यवतमाळ - पुसद ५४, वाडूल ४१, मुकुटबन ६०, वर्धा - गिरड ६५, कोरा ६४, नागपूर - सोनगाव ७८, कामठी ४२, उमरेड ५६, नंद ५९, भिवापूर ६२, मंधाळ ७०, राजोली ७८, भंडारा - करडी ३४, आमगाव ७४, चंद्रपूर - मूल ४९, शेगाव ३५, चिकनी ५४, खडसंगी ४७, शंकरपूर ४५, मासाळ ३३, तालोधी ८४, सिंदेवाही ६२, पाथरी ५८, विहाड ४३, गडचिरोली - पुराडा ४७, काढोली ८९, धानोरा ३३, मुरूमगाव ३५, पेंढरी ३६, बेडगाव ३१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com