agrowon news in marathi, Heavy rain possibilities in state, Maharashtra | Agrowon

राज्यात उद्यापासून सर्वदूर पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने उद्यापासून (ता. ५) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (ता. ६) राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, रविवारपासून (ता. ८) राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण किनारपट्टीवर सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी कायम होता. मुंबई, उपनगरात पावसाने पाणीच पाणी केले, तर कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती.

पुणे : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने उद्यापासून (ता. ५) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (ता. ६) राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, रविवारपासून (ता. ८) राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण किनारपट्टीवर सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी कायम होता. मुंबई, उपनगरात पावसाने पाणीच पाणी केले, तर कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती.

उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे, तर मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची उघडीप आहे. मात्र, उत्तर बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. ६) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, शनिवारी (ता. ७) मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे सरकणार असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

साेमवारी (ता. २) कोकण किनारपट्टी, घाटमाथा येथे जोरदार, तर मध्य महाराष्ट्राचा पश्‍चिम भाग आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारीही दिवसभर मुंबईसह किनारपट्टीवर पाऊस सुरूच होता. मुंबई शहर आणि उपनगरांत पाणी साचल्याचे जनजीवन विस्कळित झाले, तर रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पूर्व विदर्भातील गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान असल्याने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. खानदेश, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान होते.

मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग)

कोकण : कल्याण ५९, अप्पर ६३, ठाकुरली ६०, उल्हासनगर ५४, पनवेल ७३, ओवले ५७, करनाळा ६५, तळोजे ६१, उरण ५२, कापरोली ५५, जसई ६०, रोहा ५३, बरोली ६०, श्रीवर्धन ५०, वालवती ५७, बोरलीपंचटण ५६, तला ६१, मर्गतम्हाणे ५७, रामपूर ९०, वाहल ९५, सावरडे ६५, असुरडे ६५, कळकवणे ५५, दापोली ७७, बुरवंडी ८२, दाभोल ५९, पालगड ५७, भारने ११३, पटपन्हाले ६६, अबलोली ९०, मंडणगड ६०, तरवल ५४, राजापूर ७८, नाटे ५५, ओनी ५४, भांबेड ६७, विलवडे ८५, मासुरे ६०, श्रावण ५६, अमबेरी ६८, सावंतवाडी ५०, बांदा ५७, आजगाव ८५, कणकवली ५४, वागडे ५२, वसई १०६, मांडवी ८९, अगशी ५८, निर्मल १११, विरार ९२, माणिकपूर ७८, कोणे ५३, साइवन ६४, कसा ९२, चिंचणी ८८, पालघर १०५, मनवर ५६, बोईसर ८९, सफला ६१, अगरवाडी ६५, तारापूर ९१, जव्हार ५४, तलवडा ११०.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी २०, त्र्यंबकेश्‍वर २८, बोरडी २५, म्हसावद ३१, रिंगणगाव २६, पाचोरा २०, वरखेडी २५, लोणावळा २१, वेल्हा २६, राजूर २१, हेळवाक ५०, महाबळेश्‍वर ३७, तापोळा ३८, लामज ४१, शिरोळ २२, आंबा २०, साळवण २२.

विदर्भ : अडगाव २३, दहिहांडा २९, बोरगावमंजू २०, वाळगाव २१, मोर्शी ४२, अंबडा ७६, वाठोदा २१, राजुरा ४०, खाल्लार ४८, रामतीर्थ २४, येवदा ४०. कोकर्डा ४७, असदपूर २३, हिवरी २२, आर्णी २५, कान्हान २६, खाट ३१, काटोल ५६, येनवा २९, मेटपांझरा ४५, रिधोरा ४४, मेंधळा २०, बिशनूर ३१, सावनेर ५३, केळवड ३६, खापा ४२, मोहपा ४३, खामारी २७, मासाळ २७, पालंदूर २१, बह्मपुरी २१, कुरखेडा ५४, पुराडा ४०, असारळी २१, कोर्ची ३६, देसाईगंज- वडसा ७२, शंकरपूर ९२.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...