agrowon news in marathi, heavy rain in several places, Maharashtra | Agrowon

राज्यात दमदार पाऊस; कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने जोर धरला आहे. कोकण किनापट्टीसह घाटमाथा, मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत पावसाने दाणादाण उडवून दिली. कोकणात रस्त्यांनाही ओढे-नाल्याचे स्वररूप आले आहे. मराठवाड्यात पावसाने पिकांचे नुकसान झाले. बांधा फुटून, जमिनी खरडल्या, तर हळदीचे बेणे, बियाणे वाहून गेले. उस्मानाबाद जिल्ह्यात तलाव फुटल्याने शेतीचे नुकसान झाले, नद्यांनाही दुथडी पाणी आले. आव्हा (जि: बुलडाणा) वीज पडून विमलताई श्रीराम घोंगटे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (ता.

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने जोर धरला आहे. कोकण किनापट्टीसह घाटमाथा, मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत पावसाने दाणादाण उडवून दिली. कोकणात रस्त्यांनाही ओढे-नाल्याचे स्वररूप आले आहे. मराठवाड्यात पावसाने पिकांचे नुकसान झाले. बांधा फुटून, जमिनी खरडल्या, तर हळदीचे बेणे, बियाणे वाहून गेले. उस्मानाबाद जिल्ह्यात तलाव फुटल्याने शेतीचे नुकसान झाले, नद्यांनाही दुथडी पाणी आले. आव्हा (जि: बुलडाणा) वीज पडून विमलताई श्रीराम घोंगटे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये माथेरान येथे सर्वाधिक २६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

कोकणात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून, शनिवारीही पावसाची धार सुरूच होती. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह घाटमाथ्यावर पावसाने धुवाधार हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम भागांत पावसाचा जोर अधिक होता. तर उर्वरित भागातही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या, धूळपेरणी झालेली पिके अंकुरली आहेत.

नगर, पुणे, सातारा जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाच्या जलधारांना सुरवात झाली होती. साताऱ्यात शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, वापसा होताच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. 

मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. तर, औरंगाबाद, बीड, परभणी जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. उस्मानाबादच्या उमरगा तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने परिसर जलमय झाला. उमरगा, नारंगवाडी, मुळज भागात शेतीचे बांध फुटले. तर, पळसगाव पाझर तलावाचा बांध फुटून पिकांचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पाऊस पडलेल्या भागातील नदी-नाले दुथडी भरून वाहले; तर जलसंधारणाची कामेही तुडुंब झाली. पश्‍चिम विदर्भातील अकोला व बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी (ता. २३) सकाळी ढगांच्या गडगडासह पाऊस झाला. मोताळा तालुक्यातील अाव्हा येथी विमलताई श्रीराम घोंगटे (वय ४०) ही महिला शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. बाळापूर तालुक्यात झालेल्या पावसाने रिधोरा शिवारात पवन अग्रवाल यांनी ठोक्याने केलेल्या १६ एकर क्षेत्रांवरील कपाशीचे बियाणे वाहून गेले. 

कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा
उत्तर महाराष्ट्र, गुजरात परिसरावर, तसेच दक्षिण कोकणात चक्राकार वाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या स्थिती स.िक्रय आहे. महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्याने किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात ढगाळ वातावरण आहे. राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली असून, आज (ता. २४) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहेत. तर, कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारपासून (ता.२६) पावसाचा जोर वाढणार असून, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.

शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - हवामान विभाग) : 
कोकण : माथेरान २६०, कर्जत २४०, रत्नागिरी २१०, लांजा १४०, हर्णे १३०, भिरा १२०, रोहा ११०, राजापूर १००, डहाणू, खालापूर प्रत्येकी ९०, मुरबाड, पालघर, ठाणे, वसई प्रत्येकी ७०, बेलापूर ६०, अलिबाग, खेड, मंडणगड, मोखडा, पेण, संगमेश्‍वर, सुधागड पाली, वाडा प्रत्येकी ५०, देवगड, गुहागर, कल्याण, पनवेल, वैभववाडी प्रत्येकी ४०.

मध्य महाराष्ट्र : लोणावळा २००, पाथर्डी, शेवगाव प्रत्येकी १३०, वडगाव मावळ ८०, अक्कलकोट ६०, धरणगाव, मोहोळ, सोलापूर प्रत्येकी ५०, एरंडोल, इंदापूर, कवठे महाकाळ प्रत्येकी ४०, बार्शी, भडगाव, जळगाव, माढा, मंगळवेढा, पेठ, यावल प्रत्येकी ३०.
मराठवाडा : उमरगा १५०, औंढा नागनाथ १००, चाकूर, निलंगा प्रत्येकी ८०, धर्माबाद, हिंगोली प्रत्यकी ७०, शिरूर अनंतपाळ ६०, कंधार, कन्नड, लोहा, पूर्णा, रेणापूर प्रत्यकी ५०, अहमदपूर, भूम, जळकोट, कळमनुरी, परभणी, उमरी प्रत्येकी ४०, लातूर, पैठण, फुलांब्री, शिरूर कासार, तुळजापूर, प्रत्येकी ३०.

विदर्भ : बार्शी टाकळी, मंगरूळपीर, पुसद प्रत्यकी ५०, अकोला, मालेगाव, वाशिम प्रत्येकी ४०, अर्णी, दारव्हा, करंजालाड, मानोरा प्रत्यकी ३०, पारवा २०. 

घाटमाथा : लोणावळा २१०, लोणावळा २००, वळवण १८०, ताम्हिणी, १५०, डुंगरवाडी १४०, भिरा १२०, शिरोटा ९०, कोयना पोफळी, दवडी ८०, भिवापुरी, अंबोणे ७०, खोपोली, शिरगाव ६०.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक...
बळी ः अफवांचे अन्‌ अनास्थेचेहीधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात राईनपाडा...
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटपऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
बोंड अळी, तुडतुड्यामुळे नुकसानग्रस्त...नागपूर : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे...
दुध आंदोलनाची धग कायमपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ...
दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची...नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा...
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा...नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार...
पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे...पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू...
नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे...