राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

 कोल्हापूर ः यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच वेदगंगेचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. यामुळे कागल तालुक्यातील बस्तवडेसह मळगे, कुरणी, चिखली हे चार बंधारे पाण्याखाली गेले.
कोल्हापूर ः यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच वेदगंगेचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. यामुळे कागल तालुक्यातील बस्तवडेसह मळगे, कुरणी, चिखली हे चार बंधारे पाण्याखाली गेले.

पुणे ः गुजरातचा दक्षिण भाग, कोकण ते केरळचा उत्तर भाग यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस पडला. राज्यातील एकूण १५६ मंडळांत अतिवृष्टी झाली; तर पंचाहत्तरहून अधिक ठिकाणी शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी (ता.७) पावसाने धुव्वाधार हजेरी लावली. रायगडमधील मानगाव येथे राज्यातील सर्वाधिक २५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद रविवारी (ता.८) सकाळी झाली आहे.  येत्या गुरुवारपर्यंत (ता.१२) कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. आज (सोमवारी) कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. उद्या (मंगळवार) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मराठवाडा आणि परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. समुद्रसपाटीपासून ही स्थिती ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. पूर्वेकडील छत्तीसगड राज्याच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व घाटमाथा आणि विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशीम, अकोला परिसरात पाऊस पडत आहे. रविवारी (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. राज्यात शनिवारी (ता.७) सायंकाळी कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यातील अनेक मंडळांच्या ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रातील नाशिकमधील उभेरठाणा, बाऱ्हे, बोरगाव, सुरगाणा, पेठ, जागमोडी या मंडळांच्या ठिकाणी अतिवृष्टी झाली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, तापोळा, लामज, तर कोल्हापुरातील करंजफेन, आंबा, राधानगरी, साळवण, हेरे येथे अतिवृष्टी झाली. शनिवारी (ता.८) पुणे, नगर, सातारा, नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात हलक्या स्वरूपाचा पडला. खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील काही मंडळांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जालना ग्रामीण येथे १२२, वाडीगोद्री येथे १०५ मिलिमीटर पाऊस पडला, तर औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील वाऱ्हा, चंद्रपुरातील गडचांदूर या मंडळांच्या ठिकाणी अतिवृष्टी झाली. उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. रविवारीही या भागात ढगाळ हवामान होते.

राज्यातील सत्तर मिलिमीटरहून अधिक पडलेली पावसाची ठिकाणे ः स्राेत - कृषी विभाग कोकण विभाग ठाणे : ठाणे १२५, बलकुम १६५, भाइंदर १३६, दहिसर १८५, बेलापुर ११८, कल्याण २४५, अप्पर २३०, टिटवाळा ११२.३, ठाकुरली २३८, नडगाव १२३, धसइ ७२, देहरी ७१, उल्हासनगर ११७, अंबरनाथ १९२.४, गोरेगाव १०४.४, कुमभर्ली १४७.२, बदलापूर १४८ रायगड : पोयनड ९०, चरी ८३, रामरज ७३, पवयंजे १४६, ओवले १०९, करनाळा १६३, तलोजे १०७, मोराबी १४१, कर्जत २३१.४, नेरळ १११, कडाव २०५, कळंब १०९, कशेले १९५, चौक १९७, वौशी २१२, खोपोली २२१ पाली ११५, आटोने २०७, जांभूळपाडा १२०, पेण ८०, हमरापूर १८०.२, वशी ८२, कामरली १०४, महाड २४४, बिरवडी २१९, करंजवडी १८७, नाटे २१४, खारवली १५१, तुडली २३५, माणगाव २५०, इंदापूर १३२, गोरेगाव २१०, लोनेरे २१४, निझामपूर १२५, रोहा ८१, नागोठणे १७३, चानेरा ९४, कोलाड १६५, पोलादपूर १४०, कोंडवी १२५, वाकण १३९, मुरूड ९८, म्हसला १४२, खामगाव १६५.८ रत्नागिरी : चिपळूण १२६, खेरडी १२३, मरगतम्हाणे ११५, रामपूर २१०, वाहल १५०, सावरडे १८४, असुरडे १७५, कलकावणे ८५, शिरगाव १६५, दापोली १५५, बुरवंडी १५०, दाभोल १४९, वाकवली १७६, पालगड २२८, वेलवी १५६, खेड १९२, शिरशी १४७, अंबवली १२९, कुलवंडी १९७, भारने १८२, दाभील १२५, धामनंद ९६, गुहाघर ९०, तलवली ११०, पटपन्हाले ११०, अबलोली १००, हेडवी ८२, मंडणगड १६०, म्हाप्रल १५१, देव्हरे १६८, जायगड ७१, कडवी १७३, मुरडव १६६, माखजन १६५, फुंगुस १४४, फनसावणे १८२, अंगवली ९०, कोडगाव ८८, देवरुख १००, तुलसानी ८६, माभले १०५, तेरहे १०९, राजापूर ७७, सवंडल ९३, पाचल ९०, सातवली ८६, सिंधुदुर्ग : सावंतवाडी ९५, तालवट ७३, भेडशी ७९, पालघर ः वसई १८१, मांडवी १४९, अगशी ८५, निर्मल ११६, विरार १९२, मानिकपूर १६७, वाडा १०३ , कडूस १०९, कोणे १६६, कांचगड २०४, डहाणू ११८.१, मालयण ११२.८, साइवन १०८.२, कसा १९१, चिंचणी ११५, पालघर १६७, मनवर १४१, बोयसर १२२.५, सफला १६६, अगरवाडी १६८, तारापूर ११८, जव्हार ८७, साखर २१२, मोखडा ८२.६, तलसरी १२५, झरी १३७, विक्रमगड ७५, तलवड २६०

मध्य महाराष्ट्र ः नाशिक : उभेरठाणा ८५.८, बाऱ्हे ७१.२, बोरगाव १४०, सुरगाणा ११०.३, पेठ ७२.५, जागमोडी ८८.४, सातारा : महाबळेश्‍वर ११९, तापोळा १२९.२, लामज १३३.४, कोल्हापूर : करंजफेन ९२, आंबा १०७, राधानगरी ८४, साळवण ७५, हेरे ८१

मराठवाडा ः जालना : जालना ग्रामीण १२२, वाडीगोद्री १०५,

विदर्भ ः अमरावती : वाऱ्हा ७५, चंद्रपूर ः गडचांदूर १९८.४,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com