agrowon news in marathi, high rate for Gujrati cotton bales in india, Maharashtra | Agrowon

दर्जेदार सुतासाठी गुजराथी खंडीला देशात सर्वाधिक दर
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 29 जून 2018

कापसाचे दर स्थिर आहेत. सरकीचे दर २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. हे दर टिकून राहतील, असे मला वाटते. 
- अरविंद जैन, माजी अध्यक्ष, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन

जळगाव : कोम्ड (प्रथम ग्रेड) सुताला मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक २२५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला आहे. चीनकडून सूत आयातीसंबंधीचे नवे सौदे अलीकडच्या महिनाभरात झाले आहेत. परिणामी दरवाढ झाली असून, सुताचे दर कमी झालेले नाहीत. यातच डॉलरचे दर ६८.७ रुपये प्रतिडॉलर, असे सोमवारी दुपारी १२च्या सुमारास पोचले. यातच दाक्षिणात्य सूतगिरण्या किंवा मिलांसमोर दर्जेदार रुईच्या तुटवड्याचे संकट उभे राहत असून, डॉलरचे दर उच्चांकी पातळीवर असल्याने निर्यातीला अनुकूल वातावरण कायम असल्याचे सूत व रुईच्या उद्योगातील जाणकारांनी म्हटले आहे. 

देशातील पंचतारांकित व नव्याने उभारलेल्या खासगी, सहकारी सूतगिरण्या किंवा मिलांमध्ये कोम्ड यार्न (सूत) अधिकचे तयार करण्याची स्पर्धा जणू सुरू आहे. दर्जेदार रुईची मागणी यामुळे कायम आहे. कोम्ड यार्नमध्ये ७२ टक्‍क्‍यांपर्यंत उत्तम धागा मिळतो. होजिअरीसाठी त्याचा वापर केला जातो. सध्या त्याची देशातून चीनसह युरोप, व्हीएतनाम येथे अधिकची आयात केली जात आहे. देशातील सूत निर्यात साडेतीन टक्‍क्‍यांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

चीन व युरोप, व्हीएतनामध्ये सुमारे ५०० मेट्रिक टन सूत निर्यासंबंधीचे सौदे या महिन्यात देशात झाले आहेत. आणखी सौदे सुरू आहेत. दाक्षिणात्य व महाराष्ट्रीय मिलांसाठी ही चांगली संधी आहे. याच वेळी दर्जेदार रुईसंबंधी दाक्षिणात्य मिलांनी चिंता व्यक्त केली असून, तेथे तुटवडा जाणवू लागला आहे. तमिळनाडू व कर्नाटकमधील सुमारे १५० सूतगिरण्या किंवा मिलांना कापूस तुटवड्यासंबंधीचे संकट ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अडचणीत आणणारे ठरणार आहे. 

सूत निर्यातीला चालना मिळत असल्याने रुईची देशांतर्गत मागणी कायम आहे. कोम्ड होजिअरी सूताला सर्वाधिक दर असतानाच कार्डेड व्हीविंग सूताला २०० रुपये प्रतिकिलोचे तर ओपन अँड सूतालाही मागील वर्षाच्या तुलनेत किलोमागे २० रुपयांनी अधिक दर असल्याची माहिती मिळाली. 

होजिअरीसंबंधी कोम्ड सुताला अधिकची मागणी जगभरातून सुरू असल्याने दर्जेदार रुईसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातच्या शंकर ६ च्या खंडीला (३५६ किलो रुई) सर्वाधिक ४७ हजार २०० ते ४७ हजार ३०० रुपये दर आहेत. तो मुबलक प्रमाणात मिळत आहे. तर मध्य प्रदेशातील डीसीएच ३२ या ३४ ते ३५ मिलिमीटर लांबीच्या रुईला ५५५०० ते ५८००० हजार रुपये प्रतिखंडीचा दर आहे. परंतु डीसीएच ३२ या प्रकारच्या रुईचा देशांतर्गत बाजारात फारसा पुरवठा नसल्याची माहिती आहे. 

रुईचा प्रकार          दर                         लांबी
महाराष्ट्र

एमईसीएच १   ४५७०० ते ४६२००          २९  मिलिमीटर
एमईसीएच १      ४६२०० ते ४६७००        ३०  मिलिमीटर

गुजरात
व्ही ७९७ (कल्याण)    २९५०० ते ३१५००         २२  मिलिमीटर
शंकर ६            ४५८०० ते ४६३००          २८.५  मिलिमीटर
शंकर ६            ४६८०० ते ४७३००          २९  मिलिमीटर (अ श्रेणी)

तेलंगण (आंध्र प्रदेश)
आदिलाबाद        ४४८०० ते ४६८००          २९.३ मिलिमीटर
बन्नी ब्रह्मा (वरंगल)  ४४८०० ते ४६८००    २९.३ मिलिमीटर
एमसीयू ५ (गुंटूर)   ४४८०० ते ४७३००          २९.३ मिलिमीटर 

मध्य प्रदेश
एमईसीएच १    ४५५०० ते ४६०००          २९  मिलिमीटर
एमईसीएच १   ४६००० ते ४६५००          ३०  मिलिमीटर
डीसीएच ३२   ५५५०० ते ५८०००       ३४ ते ३५ मिलिमीटर

प्रतिक्रिया
सूताचे दर दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहेत. कोम्ड होजिअरी यार्नला (सूत) अधिकचा उठाव आहे. त्यासाठी दर्जेदार रुईची गरज मिलांना आहे. दर्जेदार रुईचा तुटवडा दाक्षिणात्य मिला किंवा सूतगिरण्यांना जाणवू लागला असून, तेथील सूतगिरण्यांशी संबंधित संघटनांनी तशी चिंता अलीकडेच व्यक्त केली आहे. 
- दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि. नंदुरबार)

सूताचे दर दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहेत. कोम्ड होजिअरी यार्नला (सूत) अधिकचा उठाव आहे. त्यासाठी दर्जेदार रुईची गरज मिलांना आहे. दर्जेदार रुईचा तुटवडा दाक्षिणात्य मिला किंवा सूतगिरण्यांना जाणवू लागला असून, तेथील सूतगिरण्यांशी संबंधित संघटनांनी तशी चिंता अलीकडेच व्यक्त केली आहे. 
- दीपकभाई पाटील, 
अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि. नंदुरबार)

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...