agrowon news in marathi, Homage of bank manager due to less crop loan, Maharashtra | Agrowon

पीककर्ज वाटप होत नसल्याने लीड बँक व्यवस्थापकांचा सत्कार !
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

अकोला ः खरीप हंगाम तोंडावर अालेला असतानाही पीककर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले अाहेत. याचा निषेध म्हणून मंगळवारी (ता. १२) अकोल्यातील समर्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लीड बँक मॅनेजरला निवेदन देत पुष्पहार घालून त्यांचा प्रतिकात्मक सत्कार केला. 

अकोला ः खरीप हंगाम तोंडावर अालेला असतानाही पीककर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले अाहेत. याचा निषेध म्हणून मंगळवारी (ता. १२) अकोल्यातील समर्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लीड बँक मॅनेजरला निवेदन देत पुष्पहार घालून त्यांचा प्रतिकात्मक सत्कार केला. 

याबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले, की जिल्ह्यात शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून पेरण्या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांकडे पैसा नाही. कृषी राज्यमंत्री खोत यांनी घेतलेल्या अाढावा बैठकीत पीककर्ज वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी संकटात असतानादेखील बँका त्यांना पीक कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहे. 

शासनाचे व बँक अधिकाऱ्यांचे डोळे उघडावे, याविषयाचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी समर्थ संघटनेचे अध्यक्ष संगम मोहोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी लीड बँकेचे कार्यालय गाठून अधिकाऱ्याला शाल, श्रीफळ दिले. बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप न केल्यास यापेक्षाही मोठा सत्कार करून निषेध करण्याचा इशारा संघटनेने दिला. या वेळी संघटनेचे बाळासाहेब ठाकरे, सचिन बोनगिरे, अाकाश सिरसाट, श्रीराम टाले, प्रणव बासोडे, सचिन हागे, रवि बैस, सुनिल गणवीर, गोपाल बंड, सुनील दाेत, चक्रधर काळे यांच्यासह इतर उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...