agrowon news in marathi, import tax impose on non produce iil i, Maharashtra | Agrowon

आशियायी राष्ट्रांत उत्पादित न होणाऱ्या खाद्यतेलाच्या निर्यातीवर कर लावावा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 जुलै 2018

नाशिक : सोयाबीनला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

नाशिक : सोयाबीनला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

श्री. पटेल म्हणाले, की आशियायी राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमधील उत्पादनाला आयातकर लावता येत नाही. नेमकी हीच पळवाट शोधून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये सोयाबीन तेलाची आयात करून निर्यात करण्याचा धंदा काही जणांनी सुरू केला. ही बाब निदर्शनास येताच, मुख्यमंत्र्यांनी आयातकर लावण्याची विनंती करणारे पत्र पंतप्रधानांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहन सिंह, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना लिहिले आहे. केंद्राने त्यासंबंधीचे धोरण स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा शंभर रुपये अधिकचा भाव क्विंटलमागे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

केंद्र सरकारने सोयाबीनची क्विंटलचा किमान आधारभूत किंमत ३ हजार ३९० रुपये केली आहे. प्रत्यक्षात ३ हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. पण, नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्याच्या भावाची काय स्थिती राहील, अशी चिंता निर्माण झाली होती. अशातच, नव्याने सोयाबीन खरेदीच्या व्यवसायात उतरलेल्या लातूरच्या खासगी कंपनीने सोयाबीनचा क्विंटलचा भाव ३ हजार ५५० रुपये, असा जाहीर केला आहे.

म्हणजेच, किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. मुळातच, बोंड अळीच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरण्याकडे कल वाढला आहे, असेही त्यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...