agrowon news in marathi, improvement in banana rates, Maharashtra | Agrowon

केळी दरात किंचित सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 मे 2018

रमजान महिन्यामुळे केळी दरात वाढ झाली. मला ऑनचे दर मिळाले असून, रावेरातील केळीमधील देशांतर्गत बाजारासंबंधीची उलाढाल वाढली आहे. 
- अतुल पाटील, केळी उत्पादक, केऱ्हाळे (जि. जळगाव)

जळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली असतानाच सध्या मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वामुळे केळीची मागणीही बऱ्यापैकी आहे. रावेरातून दिल्ली, जम्मू काश्‍मीरच्या व्यापाऱ्यांकडून आगाऊ नोंदणी करून सध्या खरेदी सुरू असून, दर आणखी १५ ते २० दिवस बऱ्यापैकी राहतील, असे संकेत आहेत. 

सध्या दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपये ऑन मिळत आहे. त्यात एकाच शेतकऱ्याची १५ ते १६ मेट्रिक टन केळी असली, तर त्यास ऑन आणखी वाढवून दिली जात आहे. दिल्ली येथील व्यापारी केळीचा साठा आपल्याकडे प्री कूलिंग चेंबर, रायपनिंग चेंबरमध्ये करून घेत असून, खरेदीही रोजची सुरू आहे. रावेरमधून सध्या रोज २०० मेट्रिक टन केळी दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्‍मिर व पंजाबमध्ये पाठविली जात असून, १६ किलोच्या बॉक्‍समध्ये केळीची पॅकिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले.

केळीला मागील आठवड्याच्या सुरवातीला १०५० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. ऑन फक्त निर्यातक्षम किंवा परदेशात पाठविल्या जाणाऱ्या केळीला काही कंपन्या देत होत्या. परंतु रमजान सुरू होताच दरात क्विंटलमागे ३० रुपयांनी सुधारणा झाली आहे. दिल्ली व जम्मू काश्‍मिरातील व्यापाऱ्यांनी केऱ्हाळे, खिर्डी, ऐनपूर, निंबोल, कुंभारखेडा, रसलपूर, मस्कावद, चिनावल, निंभोरा आदी ठिकाणच्या लहान व्यापारी व मोठ्या शेतकऱ्यांशी आगाऊ रकमा देऊन सौदे केले आहेत. 

यामुळे दरात किरकोळ तेजी आली आहे. सध्या आंब्यांची आवकही वाढली आहे. ही आवक पुढील महिनाभर वाढतच राहील. अशात केळीच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्‍यता होती, परंतु रमजान महिन्यामुळे दर टिकून राहतील. पुढील २० दिवस दर स्थिर राहतील किंवा आणखी किंचित वाढतील, अशी माहिती मिळाली आहे. 

प्रतिक्रिया
केळी दरात किरकोळ वाढ झाली आहे. दर टिकून आहेत. लोकल (ठाणे, मुंबई) मागणीही आहे. तर दिल्ली, पंजाब, जम्मू काश्‍मीरसाठी बॉक्‍स पॅकिंगही सावदा येथे सुरू आहे. 
- सुधाकर चव्हाण, केळी व्यापाराचे जाणकार
 

इतर अॅग्रो विशेष
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
शेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...
‘एमएसीपी’चे फलित काय ?पुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...
एकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...
स्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...
केरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...
वानरांचा बंदोबस्त करणार कसा? माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...
योजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...
क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...
‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...
मॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...
मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...
वर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...