agrowon news in marathi, Increase in water storage in bunds with miniatures | Agrowon

मराठवाड्यातील लघुप्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील पाणीसाठ्यात वाढ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील लघुप्रकल्पांसह तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यात किंचित वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. या वाढीमुळे मराठवाड्यातील एकूण ८६७ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा गत आठवड्याच्या तुलनेत ०.२५ टक्‍क्‍यांनी का होईना वाढल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील लघुप्रकल्पांसह तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यात किंचित वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. या वाढीमुळे मराठवाड्यातील एकूण ८६७ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा गत आठवड्याच्या तुलनेत ०.२५ टक्‍क्‍यांनी का होईना वाढल्याची स्थिती आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात गत आठवड्यात असलेला १२.१२ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा २२ जूनअखेर कायम होता. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पात गत आठवड्यात असलेल्या ११.२४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्यात ११.५८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. ७४६ लघुप्रकल्पात आधी ७.६९ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा ८.८४ टक्‍क्‍यांवर जाऊन पोहाेचला आहे. 
तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांत २१.३६ टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा वाढून २२ जूनअखेर २२.५१ टक्‍क्‍यांवर आला होता. ११ मोठ्या प्रकल्पांपैकी दहा प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा असून, अकरापैकी येलदरी, सिद्धेश्वर, उर्ध्व पेनगंगा व सीनाकोळेगाव या मोठ्या प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंबही नाही.

७५ पैकी ६२ मध्यम प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ११ मध्यम प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. एका मध्यम प्रकल्पात ५० ते ७५ टक्‍के तर एका प्रकल्पात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. २२ जूनअखेरपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सोळा मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा शून्य टक्क्‍यांवर आला आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठ्यात तीन टक्‍के घट नोंदली गेली आहे. ७४६ लघुप्रकल्पांपैकी ६८२ लघुप्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ४२ प्रकल्पात २५ ते ५० टक्‍के, तर १५ प्रकल्पात ५० ते ७५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा असून, त्यामध्ये सर्वाधिक ५ प्रकल्प उस्मानाबादमधील आहेत. गतवर्षी जनूच्या तिसऱ्या आठवड्यातही केवळ ९ टक्‍के उपुक्‍त पाणीसाठा मराठवाड्यातील लघुपाटबंधाऱ्यांमध्ये कायम होता. यंदा तेवढाच पाणीसाठा २२ जनूअखेर कायम होता. लातूर व नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी एका लघुप्रकल्पात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर बातम्या
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
खानदेशात ठिकठिकाणी हलका पाऊसजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
शेतकऱ्यांच्या मागण्या निकाली काढा;...अकोला : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबत...
नाशिक जिल्ह्यात ८८ हजार बालके कुपोषितनाशिक : नाशिक जिल्ह्यात एकूण ८८ हजार २९१ बालके...
निधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई : दादा...नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
फवारणीवेळी सुरक्षा किट वापरण्याला...औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (...
नगर जिल्ह्यात ५६ गावांत पितात दूषित पाणीनगर ः पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी...
भविष्यात द्राक्षाला चांगले दिवस :...पलूस, जि. सांगली ः भविष्यात द्राक्षाला चांगले...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
कारंजा रमजानपूर प्रकल्पास सुधारित...मुंबई : अकोला जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
आढळा परिसरात दुष्काळी स्थितीअकोले, जि. नगर : नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत...
इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज...अकलूज, जि. सोलापूर : चालू वर्षी देशात साखरेचे...
धुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला...जळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...