agrowon news in marathi, India have opportunity in cotton market, Maharashtra | Agrowon

कापूस बाजारात भारताला संधी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

डॉलरच्या तुलनेत रुपया स्वस्त झाल्याने इतर देशांच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त झाला आहे. मात्र सध्या तरी चीन अमेरिकेडून अप्रत्यक्षरित्या कापूस खेरदी करण्याची शक्यता आहे. व्हिएतनाम मार्गे किंवा अमेरिकेने लावलेले शुल्कासह येथील कापूस उद्योग आयात करण्याची शक्यता आहे.   
- केथ ब्राऊन, अध्यक्ष, केथ ब्राऊन आणि कंपनी, जॉर्जिया
 

न्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका बसल्याने जगात सर्वात मोठा आयातदार ठरलेला चीन आणि सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश अमेरिका, या दोन्ही देशांमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार विविद आणखी बिघडले आहेत. चीन येणाऱ्या काळात आणखी कापूस आयात करण्याच्या तयारीत आहे, तर भारताकडे निर्यातीसाठी कापूस उपलब्ध आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनच्या व्यापार विवादात भारताला लाभ होऊ शकतो.

चीनमध्ये चालू कापूस हंगामात कापूस पिकाला फटका बसला त्यामुळे उत्पादन घटले आहे. तसेच देशांतर्गत गरज भागविण्यासाठी चीनने यापूर्वीच मोठी आयात केली आहे. चीनला आणखी कापूस आयात करण्याची गरज भासणार आहे. त्यातच आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वोत मोठा कापूस निर्यातदार अमेरिका ठरत आहे. मात्र अलीकडच्या काळात अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार विवाद वाढला आहे.

त्यामुळे भारताला चीनमध्ये कापूस निर्यात करण्याची संधी आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया स्वस्त झाल्याने त्याचा लाभ कापूस निर्यात करण्यास होईल. इतर आशियाई देशांच्या तुलनेत भारतीय कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झाला आहे.

‘‘मंगळवारी (ता.१९) झालेल्या व्यवहारात कापूस दर न्ययॉर्कच्या बाजारात आयसीई फ्युचरमध्ये एक्सचेंज लिमिटमुळे तुटले होते. दर चार वर्षीच्या ९४.८२ सेंटच्या उच्चांकीवरून १२ टक्के घसरले होते. या वेळी चीनने अमेरिकेतून जवळपास १५ लाख गाठी कापसाची खरेदी केली. मात्र व्यापारी आता हा झालेला व्यवहार रद्द करण्याच्या विचारात आहेत,’’ अशी माहिती मेंमफीस येथील रोज कमोडीटी ग्रुपचे संशोधन आणि विश्लेषण संचालक लुईस रोज यांनी दिली.

चीन, अमेरिकेत उत्पादन घटण्याची शक्यता
कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने मागील आठवड्यात या हंगामात कापूस उत्पादन ८.३ टक्क्यांनी वाढणार आहे आणि त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल. चीनमध्ये २०१५ च्या विक्रमी कापूस उत्पादनानंतर येथे कापूस लागवड घट आणि पिकाला फटका बसल्याने उत्पादन घटले. त्यामुळे येथील सरकारने देशांतर्गत पिकाला हवामानाचा फटका बसल्याने देशातील चांगल्या लांब धाग्याच्या कापसाचा होणार तुटवडा भरून काढण्यासाठी अतिरिक्त आयात कोट्याला मान्यता दिली आहे. तसेच अमेरिकेतील महत्त्वाच्या कापूस उत्पादक पश्चिम टेक्सास मध्ये दुष्काळी स्थिती असल्याने येथे कापूस पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेत कॉटन फ्युचरमध्ये यंदा २१ टक्के वाढ झाली आहे.   

प्रतिक्रिया
मंगळवारी (ता.१९) झालेल्या व्यवहारात कापूस दरचार वर्षीच्या ९४.८२ सेंटच्या उच्चांकीवरून १२ टक्के घसरले होते. आम्ही कापूस दरात ज्या वेगाने वर गेलो होतो त्याच वेगाने खालीसुद्धा येत आहेत.
- लुईस रोज, संशोधन आणि विश्लेषण संचालक, रोज कमोडीटी ग्रुप, मेंमफीस, अमेरिका

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
एकात्मिक शेतीचा गाडा कुठे अडला?पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती, शेतीपूरक...
बळी ः अफवांचे अन्‌ अनास्थेचेहीधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यात राईनपाडा...
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटपऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
बोंड अळी, तुडतुड्यामुळे नुकसानग्रस्त...नागपूर : बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे...
दुध आंदोलनाची धग कायमपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ...
दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची...नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा...
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा...नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार...
पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे...पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू...
नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे...