agrowon news in marathi, India hiked import duty on American chana and lentil, Maharashtra | Agrowon

भारताकडून अमेरिकेच्या हरभरा, तुरीच्या आयात शुल्कात वाढ
वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर आयात शुल्क वाढविल्याने भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या काबुली हरभरा, देशी हरभरा आणि तूर आयातीवरील आयात शुल्क वाढविले आहे. काबुली आणि देशी हरभऱ्यावरील आयात शुल्क आता ७० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे, तर तूर आयातीवरील शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. ही शुल्कवाढ चार आॅगस्टपासून अंमलात येणार आहे. 

नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर आयात शुल्क वाढविल्याने भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या काबुली हरभरा, देशी हरभरा आणि तूर आयातीवरील आयात शुल्क वाढविले आहे. काबुली आणि देशी हरभऱ्यावरील आयात शुल्क आता ७० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे, तर तूर आयातीवरील शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. ही शुल्कवाढ चार आॅगस्टपासून अंमलात येणार आहे. 

अमेरिकेने ९ मार्चला भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर आयात शुल्क वाढविले होते. त्यामुळे भाराताला २४१ दशलक्ष डॉलरेच शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे भारतातील निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अमेरिकेच्या या निर्णयाला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतानेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काबुली हरभरा आणि देशी हरभरा व तूर या शेती पिकांचा समावेश आहे. तर इतरही काही वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्यात आले आहे. 

अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा करआकारणी ४ ऑगस्टपासून सुरू होईल. यामध्ये वाटाणा, चना, मसूर डाळ यांच्यावरील ३० टक्के कर आता ७० टक्के करण्यात येईल. डाळींवरील कर ३० टक्‍क्‍यांवरून ४० टक्के केला जाईल. अमेरिकेतून आयात होणाऱ्या अख्ख्या बदामावरील आयात शुल्क प्रतिकिलो १०० रुपयांवरून १२० रुपये करण्यात येईल. सोललेल्या बदामावरील आयातशुल्क प्रतिकिलो ३५ रुपयांवरून ४२ रुपये होईल.

बोरिक ॲसिडवरील आयात शुल्क १७.५० टक्के करण्यात आले असून, फॉस्फरिक ॲसिडवरील आयातशुल्क १० टक्‍क्‍यांवरून २० टक्के करण्यात आले आहे. पोलाद उत्पादनांवरील आयात शुल्क १५ वरून २७.५० टक्के करण्यात आले आहे. कोळंबी प्रकारातील मासे आयातीवर १५ टक्क्यांपर्यंत आयातशुल्क वाढविण्यात आले आहे. तसेच काही प्रकारातील काजू, लोखंड आणि स्टील उत्पादने, सफरचंद, मोती, स्टेनलेस स्टलीचे उत्पादने, इतर धातूंचे स्टील, ट्यूब आणि पाइप फिटिंग आणि स्क्रू, बोल्ट आणि रिव्हीट या वस्तूंच्या आयात शुल्कात वाढ केली आहे.

मागील आठवड्यातच भाराताने ३० वस्तूंच्या आयातीवर ५० टक्क्यांवर्यंत आयातशुल्क वाढवीत असल्याची यादी जागतिक व्यापार संघटनेकडे सोपविली होती. अमेरिकेने ९ मार्चला भारताच्या विशिष्ट स्टील आणि ॲल्युमिनिअम वस्तूंच्या आयातीवर शुल्क वाढविले आहे. त्यामुळे भाराताला २४१ दशलक्ष डॉलरचा फटका बसणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला भारताने आयातशुल्क वाढवून जशास तसे उत्तर दिले आहे.    

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...