agrowon news in marathi, Interest subvention scheme to be under DBT mode, Maharashtra | Agrowon

पीककर्जावरील व्याज सवलत योजना यंदा डीबीटीवर आणणार
वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई ः चालू आर्थिक वर्षापासून तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पकालीन पीककर्जावर व्याज सवलतीची योजना डीबीटी पद्धतीने राबविली जाणार असल्याचे रिझर्व बॅंकेने शुक्रवारी (ता. ८) जाहीर केले. अल्पकालीन पीककर्जाच्या व्याज सुविधेसाठी सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षात १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने अधिसूचनेत म्हटले आहे, की व्याज सवलत योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ईशान्य विभागासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. व्याज सवलत २०१८ -१९ योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला कळविले आहे.

मुंबई ः चालू आर्थिक वर्षापासून तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पकालीन पीककर्जावर व्याज सवलतीची योजना डीबीटी पद्धतीने राबविली जाणार असल्याचे रिझर्व बॅंकेने शुक्रवारी (ता. ८) जाहीर केले. अल्पकालीन पीककर्जाच्या व्याज सुविधेसाठी सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षात १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने अधिसूचनेत म्हटले आहे, की व्याज सवलत योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ईशान्य विभागासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. व्याज सवलत २०१८ -१९ योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने रिझर्व्ह बॅंकेला कळविले आहे.

या योजनेसाठी मंजूर केलेल्या अटी व शर्तीनुसार, पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत ही व्याज सवलत योजना २०१८ -१९ मध्ये कार्यान्वित होईल, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना ७ टक्के अनुदानित व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतच्या अल्पकालीन पीककर्जाचा लाभ घेता येईल. दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास तो व्याजदर ४ टक्‍क्‍यांपर्यंतदेखील खाली जाईल.

भारत सरकारच्या सल्ल्यानुसार, २०१८-१९ पासून ही योजना डीबीटीवर आणण्यात आली आहे. याबरोबरच ती रोख स्वरूपात नसणार असून, सेवा स्वरूपात राहील. व्याज सवलत योजना लागू झाल्यानंतर कर्जाची सर्व प्रक्रिया आयएसएस पोर्टल, डीबीटी प्लॅटफॉर्मवर असणे आवश्‍यक असणार आहे, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. कर्जाचे वर्गीकरण करण्याच्या विस्तृत पद्धतीवर काम करण्यात येत आहे. योजनेची रूपरेषा ठरविली गेल्यानंतर बॅंक स्वतः कर्जदारांची श्रेणीनुसार माहिती मिळवू शकेल. तथापि, प्रत्येक वर्गात दिलेल्या कर्जावर कोणतीही मर्यादा नाही, असेही बॅंकेने म्हटले आहे.

व्याज सवलत योजनेअंतर्गत नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण बॅंका, सहकारी बॅंका, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि खासगी बॅंकांना व्याज सवलत दिली जाते. त्याद्वारे शेतकऱ्यांना अनुदानित व्याजदराने अल्पावधीच्या मुदतीसाठी कर्ज दिले जाते.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...