agrowon news in marathi, irregularity in tur perches in Akot, Maharashtra | Agrowon

अकोटमध्ये तूर खरेदीत अनियमितता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 जुलै 2018

अकोला ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर मागील हंगामात ७ फेब्रुवारी ते २२ एप्रिल २०१७ याकाळात तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा चौकशी अहवाल अकोट सहायक उपनिबंधकांनी दिला अाहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणी अकोट पोलिसात फिर्याद करण्यात अाली असून पोलिसांनी कायदेशीर बाबी तपासण्यासाठी तूर्त हे प्रकरण चौकशीवर ठेवले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार अाहे.      

अकोला ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर मागील हंगामात ७ फेब्रुवारी ते २२ एप्रिल २०१७ याकाळात तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा चौकशी अहवाल अकोट सहायक उपनिबंधकांनी दिला अाहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणी अकोट पोलिसात फिर्याद करण्यात अाली असून पोलिसांनी कायदेशीर बाबी तपासण्यासाठी तूर्त हे प्रकरण चौकशीवर ठेवले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार अाहे.      

याबाबत अधिक माहिती अशी, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी पणनमंत्र्यांकडे तूर खरेदीबाबत तक्रार केली होती. मंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे जिल्हा उपनिबंधकांना अादेश दिले होते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी सहायक उपनिबंधकांना संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याबाबत नियुक्त केले. या प्रकरणाचा अाता जवळपास वर्षभराने अहवाल अाला अाहे. त्यातही स्पष्टपणे व थेट दोषींची नावे देण्यात अालेली नसल्याचे सांगितले जाते. भ्रष्टाचार झाला असा फक्त अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ फेब्रुवारी ते २४ एप्रिल २०१७ या काळात झालेल्या तूर खरेदीत टोकण व पास वाटपात अनियमितता झाली असल्याची बाब तक्रारीद्वारे सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास अाणून देण्यात अाली होती. त्यावर नियुक्त चौकशी समितीने नुकताच आपला अहवाल जिल्हा उपनिबंधक जी. जी. माळवे यांच्याकडे सादर केला आहे.  उपरोक्त काळात शासनाच्या बाजार हस्तक्षेप हमीभाव योजनेनुसार सुमारे २० कोटी ३९ लाखांची तूर खरेदी झालेली अाहे.

एका टोकणवर एक नाव असताना प्रवेशपासवर चार ते पाच जणांची नावे होती. एका टोकणवर अनेकांची नावे दर्शवून तूर खरेदी झाली. रद्द झालेल्या ४४०१ ते ४५०० या टोकणवरही पास देवून तूर खरेदी झाली. एकूण १२०० शेतकरी अभिप्रेत असताना २६७४ शेतकऱ्यांकडून माल खरेदी दर्शविण्यात अाला. एका ट्राॅलीमध्ये साधारणतः ५० ते ५५ क्विंटल माल बसतो. मात्र प्रत्यक्षात १४५ ते १६० क्विंटल माल खरेदी झाला. एकाच ट्रॉलीची एका टोकणवर दोनवेळा मोजणी झाल्याचा संशय घेतल्या जात अाहे.

चौकशी समितीला अाढळलेल्या संशयास्पद बाबींची संपूर्ण माहिती अहवालात देण्यात अाली. या अहवालानुसार चाैकशी अधिकाऱ्यांच्या अादेशाने सहायक उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी गवई यांनी पोलिसात फिर्याद दिली. तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात जी अनियमितता झाली त्यासाठी तालुका खरेदी विक्री, कृषी उत्पन्न बाजार समिती, विदर्भ को- अाॅप. मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमएफ) यांच्याकडून नियमांची पायमल्ली केल्या गेली असे चौकशीनंतर निरीक्षण नोंदवण्यात अाले. 
 

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...