agrowon news in marathi, jiva pandu gavit says, if land not transfer on farmers name then will organize long march Maharashtra | Agrowon

कसणाऱ्यांच्या नावे सातबारा न निघाल्यास पुन्हा लाँग मार्च ः जिवा पांडू गावित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

सुरगाणा, जि. नाशिक : वनजमीन नावावर होऊन कसणाऱ्याच्या नावे येत्या तीन महिन्यांत सातबारा न निघाल्यास पुन्हा एकदा कळवण ते मुंबई असा लाँग मार्च काढून लाल वादळाची ताकद सरकारला दाखवू, असा इशारा आमदार जिवा पांडू गावित यांनी दिला. हुतात्मा लक्ष्मण बागुल यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी (ता. १३) सुरगाणा तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते.

सुरगाणा, जि. नाशिक : वनजमीन नावावर होऊन कसणाऱ्याच्या नावे येत्या तीन महिन्यांत सातबारा न निघाल्यास पुन्हा एकदा कळवण ते मुंबई असा लाँग मार्च काढून लाल वादळाची ताकद सरकारला दाखवू, असा इशारा आमदार जिवा पांडू गावित यांनी दिला. हुतात्मा लक्ष्मण बागुल यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी (ता. १३) सुरगाणा तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, सुनील मालुसरे, सभापती सुवर्णा गांगुर्डे, उपसभापती इंद्रजित गावित, सावळीराम पवार, रामजी गावित, भिका राठोड, रमेश वाडेकर, विजय घांगळे, धनजी चौधरी, उत्तम कडू, मनिषा महाले, नगराध्यक्ष सोनाली बागुल, नगरसेवक अकील पठाण, राजुबाबा, सुरेश गवळी, सुभाष चौधरी, धर्मेंद्र पगारीया, कळवणचे हेमंत पाटील, मोहन जाधव, जगन माळी, बाबाजी जाधव, राजाराम गांगुर्डे, वैभव जाधव, नीलेश जाधव, उपविभागीय अधिकारी अमन मितल, तहसीलदार दादासाहेब गिते, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर आदीसह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
या वेळी गावित म्हणाले, मुंबईच्या मोर्चात मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्यांची पूर्तता येत्या सहा महिन्यांत करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप मागण्यांसंदर्भात कोणत्याही हालचाली सरकारकडून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी मुंबईच्या मोर्चाकरिता तयार राहावे.

सध्या पात्र दाव्यांची वनजमिनीची मोजणी जीपीआरएसने सुरू आहे. ती दोन हजार पाचच्या गुगल मॅपशी मॅच झाल्यास तेवढी जमीन मिळेल. वनजमिनीची मोजणी करताना महसूल विभाग, वनविभागाचे कर्मचारी उपस्‍थित राहाणे गरजेचे होते. मात्र, ते का उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...